जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे
यांचा
जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव,दि. 7:- कृषी, पशुसंवर्धन,
दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे
कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
मंगळवार दि. 8 ऑक्टोबर 2013 रोजी
सकाळी 11.00 वा. शासकीय मोटारीने वाकोद ता. जामनेरकडे प्रयाण, दुपारी 12.00 वा.
अखिल भटका जोशी समाजसेवा संघ आयोजित भव्य
मेळावा स्थळ - साक्रादेवी, मंदिराजवळ, वाकोद ता. जामनेर, जि. जळगाव, दुपारी 4.00
वा. ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम स्थळ :- भाग्यलक्ष्मी लॉन, वरणगाव,
संध्याकाळी सोयीनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण
* * * * * * * *
फटाका विक्री परवानासाठी
15 ऑक्टोबर पर्यत अर्ज सादर करावेत
जळगाव, दि. 7 :- दिपावली सणानिमित्त ज्यांना तात्पुरते फटाके
विक्री करीता परवाने पाहीजे असतील
त्यांनी जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांच्या
कार्यालयात अर्ज सादर करावेत.अर्जावर 5
रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावून अर्जासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.
संबंधीत पोलिस स्टेशनचा तात्पुरता फटका
परवाना देण्यास हरकत नसल्याबाबतचा दाखला, ज्या जागेत तात्पूरता फटाका परवाना
पाहिजे त्या जागेत फटाका परवाना देण्यास नाहरकत बाबतचा संबंधीत ग्रामपंचायत,
नगरपालिका यांचा ना-हरकत दाखला, परवना फी रक्कम रुपये 500/- असून 0070, इतर
प्रशासकीय सेवा, 60 इतर सेवा 103 वसूली विस्फोटक अधिनियम (6) या लेखाशिर्षाखाली सरकारी
खजिन्यात ( स्टेट बॅकेत ) चलनाने जमा करुन चलनाची एक प्रत जिल्हादंडाधिकारी
कार्यालय, जळगाव (गृह शाखा) यांचे मार्फत पास करण्यात येतील, दोन पासपोर्ट साईज
फोटो, दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाका विक्रीचे परवाना मिळणेबाबतचे अर्ज
दिनांक 10 ते 15 ऑक्टोबर 2013 या कालावधीत अर्ज करावेत. तसेच दिनांक 15 ऑक्टोंबर
2013 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज केल्यानंतर
दिनांक 20 ऑक्टोंबर 2013 नंतर परवाने जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचे कार्यालयातील
गृह शाखेमार्फत अर्जदारास वितरीत करण्यात येतील. परवाना घेवून जाण्याची जबाबदारी
अर्जदाराची राहिल.
जळगाव व भुसावळ शहराकरिता तात्पुरता
फटाके परवाना मिळवू इच्छिणा-यांनी त्यांचे किरकोळ फटाके विक्रीची दुकाने परवान्यात
नमूद केलेल्या जागेतच उभारली पाहिजेत व जळगाव भुसावळ शहरा व्यतिरिक्त जिल्हयातील
इतर शहर व गावांकरिता दुकाने नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या मोकळया
जागेवरच उभारली पाहिजेत. इतरत्र दुकाने लावून फटाके विक्री करता येणार नाही.
परवान्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन झाल्यास संबंधीत
परवानाधारकाविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असे अप्पर जिल्हादंडाधिकारी,
जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * * * *
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी
मोठया आवाजाचे फटाके वाजविण्यास बंदी
जळगाव दि, 7 :-
सर्वेच्च न्यायालयाचे रिट पिटीशन दि. 27 सप्टेंबर 2001 च्या अंतरिम आदेशान्वये
दसरा, दिवाळी व इतर सणाच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण
होणा-या ध्वनी व हवा प्रदूषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम
टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यास निर्बंध घालण्यात आले असल्याचे अप्पर
जिल्हादंडाधिकारी, यांनी कळविले आहे.
केंद्र शासन, केंद्र शासित प्रदेश आणि
राज्य शासन यांनी भारत सरकारच्या राजपत्रात दि. 5 ऑक्टोबर 1999 नुसार प्रकाशित केलेल्या
पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियमातील तरतुदींची
मुख्यात्वे करुन या नियामातील सुधारीत नियम 89 ची जे फटाक्याच्या आवाजाच्या
मानांकाबाबत आहेत. त्याची काटेकोरपणे अंमजबजावणी करावी.
एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4
मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणा-या फटाक्याच्या उत्पादन, विक्री व
वापरावर बंदी घालण्यात येत आहे. साखळी फटाक्याच्या एकूण पन्नास, पन्नास ते शंभर व शंभर
व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची
मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मिटर अंतरापर्यत अनुक्रमे 115, 110 व
105 डेसिबल एवढी असावी व यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या तसेच शंभर पेक्षा
जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात
येत आहे. फटाक्यांचे दारु काम किंवा फटाके सायंकाळी 6.00 ते रात्री 10.00 या
कालावधी व्यतिरिक्त् उडविण्यास परवानगी देण्यात येवू नये, रात्री 10.00 ते सकाळी
6.00 वाजेपर्यत दारुकाम व फटाके यांचा
वापर करण्यात येऊ नये, शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत
करण्यात येवू नये, शांतता झोन मध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये
यांच्या सभोवतालचे शंभर मीटर पर्यंतचे क्षेत्र येते. शिक्षण संस्थांच्या
व्यवस्थापक व मुख्याध्यापकांना ध्वनी व हवा प्रदूषणाने अपायकारक परिणाम
टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याना योग्य प्रशिक्षण देण्याच्या
दृष्टीने पाऊले उचलण्याबाबत निर्देश देण्यात यावेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे
सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे. मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके ,
साखळी फटाके जप्त करुन त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी. अपघात
घडणार नाही याची स्थानिक प्रशासन व अधिकारी यांनी आवश्यकत्या उपाययोजनेचे नियोजन
करुन दक्षता घ्यावी.
दिवाळी हा आनंदपर्व साजरा करतांना
योग्य ती दक्षता घेऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
मृद व जलसंधारणाचे
कामे करणाऱ्या
यंत्रधारकांनी कृषी
विभागाकडे नोंदणी करावी
जळगाव, दिनांक 7 :- पाणलोट क्षेत्र आधारीत जलसंधारण कार्यक्रमासाठी
मृद व जलसंधारणाचे कामे मशिनद्वारे करावयाची आहेत. यासाठी मशिन भाड्याने
घेण्याकरिता निविदा पध्दत कृषी विभागामार्फत सन 2013-14 पासून सुरु करण्यात आलेली
आहे. या योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तालुक्यात मृद व जलसंधारणाची कामे
करण्यासाठी इच्छूक असलेल्या व कामासाठी लागणारी आवश्यक यंत्रसामुग्री असलेल्या
यंत्रधारकांची नोंदणी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, जळगाव येथे करण्यात येणार आहे. नोंदणी न केलेल्या
यंत्रधारकांचा या योजनेत समावेश केला जाणार नाही. त्यासाठी विहीत प्रपत्रातील
नोंदणी अर्ज 15 ऑक्टोबर -2013
पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी के. एस. मुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
नोंदणीची पात्रता पुढील प्रमाणे
आहे. सर्व प्रकारची यंत्रसामुग्री स्वत:ची असलेला यंत्रधारक, स्वत:ची
यंत्रसामुग्री असलेला स्वयंसहाय्यता गट,
स्वत:ची यंत्रसामुग्री असलेली संस्था,
यंत्रधारक महाराष्ट्रातील असावा, यंत्रधारकास कोणत्याही एकाच जिल्ह्यात
नोंदणी करता येईल, यंत्रधारकाने एकापेक्षा जास्त जिल्ह्यात नोंदणी केल्यास
त्याच्या सर्व नोंदी रद्द केल्या जातील व त्यास कोणतेही काम दिले जाणार नाही.
नोंदणी शुल्क (सुरक्षा ठेव) म्हणून जे.सी.सी,
पोकलॅन्ड, ब्रेकर इत्यादी सारख्या मोठ्या
यंत्रसामुग्रीसाठी रुपये 5,000/- व टॅक्टर सारख्या छोटया यंत्रसामुग्रीसाठी
रुपये 2,000/- रकमेचा धनाकर्ष, धनादेश नोंदणी अर्जासोबत जमा करणे आवश्यक आहे.
यंत्रधारकाची नोंदणी करण्यसाठी विहीत प्रपत्रातील अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, जळगाव यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे,
असेही पत्रकात नमूद केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment