रब्बी हंगाम पिकासाठी 31
डिसेंबर पर्यत पाणी अर्ज सादर करावेत
जळगाव, दि. 9 :- गिरणा
पाटबंधारे विभाग. जळगाव अंतर्गत मन्याड, बोरी, भोकरबारी व अंजनी ( काळा बंधारा)
मध्यम प्रकल्पावरुन तसेच शिरसमणी, कंकराज, पिंपळकोठा भोलाणे, म्हसावा, बोळे, सावरखेडे
ता. पारोळा, निसर्डी, आर्डी ता. अमळनेर, खडकेसिम, पद्मालय ता. एरंडोल, मनयारखेडा,
विटनेर ता. जळगाव, खडकीसिम, कुंझर- 2, कृष्णापुरी, ब्राम्हण शेवगे, हातगांव -1,
पिंपरखेड, वाघळा-1, वाघळा -2, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळीभोरस ता. चाळीसगाव,
पथराड ता. भडगाव या लघु प्रकल्पांवरुन कालव्याव्दारे कालवा प्रवाह, कालवा उपसा,
जलशय उपसा, लाभक्षेत्रातील अधिसूचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच लाभ
क्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना
कळविण्यात येते की, यावर्षी वरील प्रकल्पात सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झालेला
असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरित उपलब्ध पाणीसाठयानुसार रब्बी हंगाम
2013-14 मध्ये दिनांक 15 ऑक्टोबर 2013 ते 28 फेब्रुवारी 2014 या मुदतीत गहू,
हरबरा, ज्वारी, दादर, हा.दूरी, मका, कडवाळ, कपाशी, सूर्यफूल, करडई, भाजीपाला
इत्यादी हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठयासाठी आपले
पाणी अर्ज नमूना क्र. 7, 7 अ व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी भरुन पाणी अर्ज दिनांक
31 डिसेबर 2013 च्या आंत संबंधीत पाटशाखेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत,
पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे. मुदती नंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार
केला जाणार नाही. सिंचनाच्या पाणीपुरवठयाच्या अटी व शर्ती नियमानुसार राहतील, असे
आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment