बाल हक्कांबाबत जागरुकता बाळगण्याचे आवाहन
जळगाव, दिनांक 29 :- महाराष्ट्र राज्य बाल
संरक्षण आयोगाची स्थापना जुलै 2007 मध्ये बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, 2005
अन्वये करण्यात आलां. बाल संरक्षण आयोगामध्ये 0 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांबाबत
विशेष संरक्षण चाइल्ड ट्रॅफिकिंग व भिक्षावृत्तीवर नियंत्रण, मोफत शिक्षणाचे
अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे.
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यकक्षेत मुले / मुली बालमृत्यू,
कुपोषण, बाल कामगार, ट्रॅफिकिंग, बालकाचे शिक्षण, निरीक्षणगृह, शेल्टर होम,
सिव्हील अनरेट व प्रोजेक्टमुळे उदभवणा-या बालकांच्या समस्या, सामाजिक, आर्थिक
राजनैतिक परिस्थिती विषयावर स्वतंत्ररित्या चौकशी करुन अहवाल शासनाला शिफारसीसह
सादर करण्याचे अधिकार आहेत. बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 अंतर्गत बाल हक्क आयोगाची कामे
पुढीलप्रमाणे आहेत.-
बाल हक्कांचे संरक्षण करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्याची तपासणी व
परिक्षण करणे त्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शिफारस
करणे, बाल हक्काच्या संरक्षणबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणे, बाल हक्क
भंगाबाबत प्रकरणांची चौकशी करणे आणि अशा प्रकरणी कायदेशीर इलाजांची शिफारस करणे,
जेथे बाल हक्कांवर दहशतवाद, जातीय हिंसात्मक कृती दंगल, नैसर्गिक आपत्ती, स्थानिक
हिंसात्मक कृती, एच आय. व्ही / एडस बाल, व्यापार, वाईट वागणूक, छळवणूक, पिळवणूक,
अश्लिल चित्रे, वेश्या व्यवसाय यांनी परिणाम होतो याबाबत योग्य त्या उपायांची
शिफारस करणे, जेथे मुलांची विशेष काळजी
घेण्याची गरज आहे आणि जेथे मुलांना यातना होत आहेत. त्यांच्यामध्ये भेदभाव ठेवला
जात आहे. त्यांची गैरसोय केली जात आहे.कायदेशिर वागणूक दिली जात नाही, अशा ठिकाणी
लक्ष घालणे पोरकी मुले आणि कैद्याची मुले यांना संरक्षण देणे, प्रबंध आणि
आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांचा अभ्यास करणे, अस्तित्वात असलेल्या धोरणाची नियतकालिका
परिक्षण हाती घेणे, बाल हक्काबाबत कार्यक्रम परिणामकारक उपायांची अंमलबजावणी
होण्यासाठी शिफारस करणे. याबाबत अधिक
माहितीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क
संरक्षण आयोग, तिसरा मजला, शासकीय परिवहन सेवा इमारत, सर पोचखानवाला रोड, वरळी
मुंबई 30 mscper@gmail.com
दूरध्वनी 022 - 24920897 येथे संपर्क साधावा बाल हक्काबाबत जागरुकता बाळगावी असे
आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * *
मोटार सायकल वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक
मालिका
जळगाव, दिनांक 29 :- उप प्रादेशिक परिवहन
कार्यालयातर्फे मोटार सायकल नवीन नोंदणी एमएच -19 / बीटी 0001 ते 9999 पर्यंतची
मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांकरीता पसंतीचा
नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज करावा व विहित शुल्क भरुन पसंतीचा क्रमांक
मिळवावा. नोंदणी शुल्क भरल्यानंतर वाहन 30 दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर
करणे बंधनकारक राहील. या मुदतीत वाहन
नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क परत होणार नाही. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव येथे संपर्क
साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
* * * * * * *
19 ते 28 नोव्हेंबर रोजी सैन्य भरतीचे आयोजन
जळगाव, दि. 29 :- स्पोर्टस स्टेडियम नांदेड
येथे दिनांक 19 ते 28 नोव्हेंबर 2013 या कालावधीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात
आलेले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार
जिल्हयातील इच्छूक तरुणांनी सैन्य भरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी, कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.
सैन्य भरतीचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.- जळगाव येथे दिनांक 22 नोव्हेंबर
2013, धुळे 25 नोव्हेंबर 2013, नंदुरबार 20 नोव्हेंबर 2013, भरतीची वेळ सकाळी 4 वाजे पासून ते सकाळी 6
वाजेपर्यत राहिल. भरतीचा ट्रेड सैनिक जनरल डयुटी, सैनिक टेकनिकल, सैनिक नर्सिग असिस्टंट, सैनिक क्लर्क, सैनिक स्टोअर
किपर, सैनिक ट्रेडमन.
शारिरीक व शैक्षणिक पात्रता
पुढीलप्रमाणे - ट्रेड सैनिक जनरल डयुटी ,
उंची 168 से. मी., वजन 50 किलो ग्रॅम, छाती 77-82 से.मी., वय 17 ½ ते 21 वर्ष, शैक्षिणक पात्रता इयता 10 वी एस. एस. सी
45 टक्के गुण आवश्यक
सैनिक टेक्निकल - उंची 167 से.मी.,
वजन 50 किलो ग्रॅम, छाती 77-82 से.मी., वय
17 ½
ते 23 वर्ष, शैक्षणिक पात्रता - भौतिक, रसायन, गणित, विषय घेवून इयत्ता 12 वी पास
असणे आवश्यक.
सैनिक टेक्निकल नर्सिग असिस्टंट - उंची 167 से.मी., वजन 50 किलो ग्रॅम,
छाती 77-82, वय 17 ½ ते 23, शैक्षणिक
पात्रता- भौतिक, रसायन, जीवशास्त्र, इंग्रजी विषय घेऊन इयत्ता 12 वी 50 टक्के पास
आवश्यक व प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक.
सैनिक क्लर्क व स्टोअर किपर :- उंची 162 से.मी. , वजन 50 किलो ग्रॅम, छाती
77-82 से.मी. वय 17 1/2 ते 23 शैक्षणिक
पात्रता- कुठल्याही माध्यमातून व इंग्रजी विषय घेऊन 12 वी 50 टक्के गुण मिळवून व
40 टक्के गुण प्रत्येक विषयात असणे आवश्यक , पदवीधर असल्यास वरील गुणवत्ता लागू
नाही.
सैनिक ट्रेडमॅन :- उंची 168 से.
मी., वजन 48 किलो ग्रॅम, छाती 76-81 से.मी. वय 17 1/2 ते 23 वर्षे, शैक्षणिक
पात्रता - इयत्ता 8 वी पास व इयत्ता 10 वी पास.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे -एस. एस. सी, एच. एस. सी . च्या गुणपत्रक व
बोर्डाच्या प्रमाणपत्राच्या मुळप्रती, बोर्ड प्रमाणपत्र नसल्यास मुळ प्रोव्हीजन
प्रमाणपत्र ज्यावर जन्म तारखेचा उल्लेख करुन संबंधित बोर्डाकडून सही व शिक्का
लावलेले असावे. ट्रान्सफर प्रमाणपत्राची मुळप्रत किंवा शाळा कॉलेजचे बोनाफाईड
प्रमाणपत्र, सरपंचाचा दाखला व सहा महिन्याच्या आतील कालावधीतील चरित्र प्रमाणपत्र
, ओपन कॅटेगिरीच्या उमेदवाराकरीता सरपंचाचा दाखला, 5 से. मी. x 4 से. मी. आकाराचा
नुकत्याच काढलेल्या रंगीत 14 फोटोंच्या प्रती, ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो चालणार
नाही. तसेच अटेस्टेड करु नये, जिल्हा दंडाधिकारी यांच्याव्दारा सही केलेले रहिवास
प्रमाणपत्र, वय व राष्ट्रीयत्वाचे
तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांचे हस्तांक्षर असलेले प्रमाणपत्र, संपूर्ण
तपशिल असलेला तहसिलदार यांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला, माजी सैनिकाचा पाल्य
असल्यास संबंधित अभीलेख कार्यालयाकडून प्राप्त झालेला अभिलेख अधिका-यांकडील दाखला.
सैनिक भर्ती ही विनामुल्य केली जाते. भरती प्रक्रियेत कोणत्याही एजंटला
थारा नाही. दलालांच्या फसवेगिरी पासून सावध रहावे अशा दलालांची माहिती मिळाल्यास
संबंधीत पोलीस स्टेशनला माहिती द्या किंवा सैनिक अधिकारी यांना माहिती द्यावी. संबंधीत
दलालावर तातडीने कारवाई करण्यात.येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन
कुलकर्णी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment