Friday, 11 October 2013

गारपीटीचा समावेश पीक विम्यात होणार : ना. विजयकुमार गावीत


गारपीटीचा समावेश पीक विम्यात होणार : ना. विजयकुमार गावीत

               जळगाव, दि. 11 :- हवामानावर आधारीत पीक वीमा योजना गारपीटीने नुकसान झाल्यास वीमाधारक शेतक-यास नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादनमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज चोपडा येथे दिली. आमदार जगदीशभाऊ  मित्र परिवार चोपडा तर्फे आयोजित मोफत रोग तपासणी व सर्वसाधारण शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. समारंभ प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. राघीनी पाटील उपस्थित होते.
             डॉ. गावीत पुढे म्हणाले , केळी नुकसानग्रस्त पीक वीमा धारक शेतक-यांना येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई मिळेल, फक्त पिकांचा वीमा योजनांचा लाभ गतवर्षी केळी उत्पादक शेतक-यांना मिळाला असून दुस-या क्रमांकावर संत्रे व तिस-या क्रमांकवर आंबा आहे. तसेच विदर्भाप्रमाणेच अतिवृष्टी सर्वेक्षणाचा निकषस्तर अतिवृष्टीग्रस्त भागास लावण्यात येणार असून सर्वेक्षण करुन योग्य ती नुकसान भरपाई दिली जाणार आहे. आयुष्याच्या संध्याकाळी अंधत्व आल्यास उरलेले जीवनक्रमन करतांना यातना सहन कराव्या लागतात. कुटूंबही लक्ष देत नाही अशा व्यक्तींना दृष्टी मिळून देण्यासाठी केलेले कार्य सर्वश्रेष्ठ समाजकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
               या  समारंभात मार्गदर्शन करतांना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी निरोगी आरोगयाचे सोपे सूत्र सांगतांना भाजी, भाकरी खा आणि आजी, आजोबा व्हा ! असे सांगून तंबाखू सोडण्याचे आवाहन केले. चोपडा पंचायत समितीचे सभापती डी. पी. सांळुखे, दिलीप सोनवणे, ॲड. रविंद्र पाटील, गप्फार मलिक, माजी आमदार गुलाबराव पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. कुमूदिनी गावीत, आमदार जगदीश वळवी यांनी मार्गदर्शन केले.
             कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमृतराज सचदेव यांनी आमदार जगदीश वळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिबीराचे आयोजन केले असून यापुढे वेगवेगळी शिबीरे  घेण्यात येणार आहेत.
              या कार्यक्रमास चंद्रहास गुजराथी, विजयाताई पाटील, गोरख तात्या पाटील, अनिल साठे, संजय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील तर आभार प्रदर्शन भरत पाटील यांनी केले.
* * * * * * * *

No comments:

Post a Comment