जळगाव जिल्हयात 20 ठिकाणी आधारभुत धान्य खरेदी
केंद्राची स्थापना
जळगाव, दि. 31 :- महाराष्ट्र शासनाने
सन 2013 -2014 या ख्ररीप हंगामात तयार झालेली ज्वारी / मका हे धान्य आधारभुत किंमत
योजने अंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जळगाव जिल्हयात एकूण 20 ठिकाणी
खरेदी केंद्र स्थापित केलेले आहे. ज्वारी / मका या भरड धान्याची खरेदी किंमत
ज्वारी 1500 प्रति क्विंटल, मका 1310 प्रति क्विंटल, बाजरी 1250 प्रति क्विंटल
शासनाने निश्चित केलेली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता दर्जाचेच धान्य खरेदी केंद्रावर
खरेदी करण्यात येईल.
सर्वसाधारण गुणवत्ता दर्जाची
ज्वारी म्हणजे काडी, कचरा व इतर अखादय दाणे बियाणे, दगड, माती, वाळू इत्यादी 1.0
टक्के, ज्वारी व्यतिरिक्त इतर अन्न धान्य 3.0 टक्के, अपरिपक्कव व सुरकुतलेले दाणे
4.0 टक्के, खराब दाणे 1.5 टक्के, अर्धवट खराब दाणे व रंगहीन 1.0 टक्के, किडांनी
पोखरलेले दाणे 1.0 टक्के, ओलावा 14.0 टक्क्यांपेक्षा कमी असावा खरेदीसाठी विक्रीस
येणारी ज्वारी विक्री योग्य पुर्णपणे
कोरडी व दाणे तयार झालेली, स्वच्छ गोड सर्व अन्नतत्वे पुर्ण असणारी एकरंगी आणि
एकसारखी असावी.
सर्वसाधारण गुणवत्ता दर्जाची
बाजरी म्हणजे काडी, कचरा व इतर अखादय दाणे बियाणे दगड, माती, वाळू इत्यादी 1.0
टक्के, बाजरी व्यतिरिक्त इतर अन्न धान्य 3.0 टक्के, अपरिपक्व व सुरकुतलेले दाणे
4.0 टक्के, ,खराब दाणे 1.5 टक्के, अर्धवट खराब दाणे व रंगहीन 1.0 टक्के, किडांनी
पोखरलेले दाणे 1.0 टक्के, ओलावा 14.0 टक्क्यांपेक्षा कमी असावा खरेदीसाठी विक्रीस
येणारी बाजरी विक्री योग्य पुर्णपणे कोरडी व दाणे तयार झालेली, स्वच्छ गोड सर्व
अन्नतत्व पूर्ण असणारी एकरंगी आणि एकसारखी
असावी.
सर्वसाधारण गुणवत्तेचा मका
म्हणजे ज्यात काडी, कचरा 1.0 टक्के, इतर अन्न धान्य 2.0 टक्के, खराब दाणे 1.5
टक्के, अपरीपक्व व सुरकुतलेले दाणे 3.0 टक्के, अर्धवट खराब रंगहीन व मार लागलेले
दाणे 4.5 टक्के, किडयांनी पोखरलेले दाणे 1.0 टक्के, ओलावा 14.0 टक्के पेक्षा कमी
असावा.
शेतक-यांनी खरेदी केंद्रावर येताना
सातबाराचा उतारा आणणे आवश्यक आहे. जळगाव जिल्हयात, जळगाव 2, जामनेर 1, भुसावळ 2,
यावल 1, रावेर तालुक्यात 2, धरणगाव 1,
एरंडोल तालुक्यात कासोदा 2, पाचोरा 1, चोपडा 1, अमळनेर 1, भडगाव 1, चाळीसगाव 1,
बोदवड 1, मुक्ताईनगर तालुक्यात 2 ( कर्की, कोथळी), पारोळा 1 असे एकूण 20 केंद्र स्थापित
करण्यात आलेले आहे. ज्वारी / मगा या भरड धान्यांच्या खरेदीचा कालावधी दिनांक 18 ऑक्टोबर 2013 ते 31 मार्च 2014 असा राहील.
* * * * * * *
No comments:
Post a Comment