9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन!भारतीय टपाल विभाग जळगावद्वारे ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा
जळगाव, दिनांक १० ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापन 9 ऑक्टोबर रोजी 1874 करण्यात आली. या पित्यार्थ 9 ऑक्टोबर रोजी सर्वत्र जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. दरवर्षी यंदाही जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने भारतीय डाक विभाग ७ ऑक्टोबर २०२४ ते ११ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहे. दरवर्षी नव्या थीमने हा सप्ताह साजरा करण्यात येतो तर यासाठी यंदाची थीम आहे "देशातील लोकांना सक्षम बनविण्याची आणि संपर्कात ठेवण्याची १५० वर्ष".
जळगाव डाक विभाग छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनेक उपक्रम घेण्यात आहे. यामध्ये जळगाव शहरातील विविध शाळामध्ये रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. पीएमओ कार्यलयाकडून पत्र स्वरूपात मिळालेले प्रतिसाद विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. यासोबतच भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये राखी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. टपाल कर्मचाऱ्यांच्या असाधारण कार्याच्या सन्मानार्थ पोस्ट मास्तर जनरल, छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ई-पत्रिका सुरू करण्यात आली. "डाक सेवा, जनसेवा" ही घोषणा जळगाव विभागात खऱ्या अर्थाने अंगीकारली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी मतदान कार्डच्या बुकिंग आणि वितरणावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासोबतच आधार लिंक डिजिटल लाइफ सर्टिफिकेट स्कीमद्वारे निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्रे जमा करण्यासाठी सरळ व सोपी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतंर्गत आयपीपीबीचे ३५००० खाती, लेक लाडकी योजनेतंर्गत ९४६ खाती, यासोबतच एकूण ५१९९६ पोस्ट ऑफिस बचत खाती उघडण्यात आली. याबरोबर रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आणि जळगाव विभागात एकूण १८ आधार सेवा केंद्र कार्यान्वित आहे. जळगाव मुख्य डाकघर येथे डाक घर निर्यात केंद्र सुरु करण्यात आली.
पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत ५३०३५ पासपोर्ट ऍप्लीकेशन्स प्रोसेस करण्यात आले आहे. ड्रायव्हिंग लायसेन्स आणि आर सी बुक वितरण सेवा देण्यात येत आहे आणि कर्मचारी आणि ग्राहकांकडून तक्रार/सूचना/फीडबॅक देण्यासाठी व्हॉट्स अॅप नंबर देखील देण्यात आले आहे.
जळगाव विभागातसुद्धा राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ज्यामध्ये ७ ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवस साजरा करण्यात आला. ह्या दिवशी सर्व पोस्टमन बंधू आणि भगिनीचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि जळगाव विभागातील सर्व BNPL व DNK ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यात आले. यासोबतच सर्व डाक कार्यालयात आलेल्या ग्राहकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ८ ऑक्टोबर रोजी जळगाव पब्लिक स्कूलमध्ये फिलॅटेली दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये जळगाव पब्लिक स्कूल येथे Philately Quiz घेण्यात आली. याबरोबर ढाई आखर पत्र लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये १६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
त्यानंतर जळगाव येथील बालनिकेतन विद्यालय येथे ढाई आखर पत्र लेखन स्पर्धेत देखील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. 'डिजिटल युगात पत्रलेखनाचे महत्त्व' असा पत्रलेखन स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला होता. 9 ऑक्टोबर रोजी अंतरराष्ट्रीय टपाल संघ (UPU) पत्र लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ओरीजन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड शाळेची विद्यार्थिनी कु.सलोनी ज्ञानेश्वर घुगेचा जळगाव विभागातर्फे गौरव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील पोस्टमास्टर जनरल अदनान अहमद यांनी २५०००/- रुपयांचा चेक देत सलोनीचा सत्कार केला. १० ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी जळगाव विभागातर्फे ग्रामीण भागात आधार मेला आयोजित करण्यात आला होता.
या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी वित्तीय सशक्तीकरण दिवस साजरा केला जाईल ज्यात सर्व ग्रामीण डाक घरात मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये लाडकी बहिण तसेच सुकन्या समृद्धी योजनेची जास्तीत जास्त खाती उघडण्यात येणार आहे. असे अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000000000
No comments:
Post a Comment