विधानसभा निवडणूक 2024
आपणास विदीत आहेच की मा.भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून म्हणजेच तत्क्षणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
जळगांव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
1 नामनिर्देशन पत्र दाखल करणे. दिनांक – 22.10.2024 ते दिनांक - 29.10.2024
वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00
(सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता)
2 नामनिर्देशन पत्र मिळणे वरील कालावधीत व वेळेत तसेच वर नमूद केलेले ठिकाणी
3 नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक – 30.10.2024 सकाळी 11.00 वाजेपासुन
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
4 उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक दिनांक. 04.11.2024 (दुपारी 3.00 पर्यंत)
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
5 मतदानाचा दिनांक व वेळ दिनांक – 20.11.2024
6 मतमोजणीचा दिनांक दिनांक – 23.11.2024
7 निवडणूक प्रक्रीया पुर्ण होण्याचा दिनांक दिनांक - 25.11. 2024
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे अनुषंगाने आयोगाच्या सूचनांचे कसोशीने पालन सर्व शासकीय / निमशासकीय विभागप्रमुख / खातेप्रमुख यांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी करावयाचे आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे महत्वाचे निर्देश पुनश्च एकदा माहितीसाठी आणि पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी देत आहोत.
निवडणूक आयोगाने अनधिकृत / विनापरवानगी करणेत आलेले विद्रूपीकरण काढणेबाबत कालमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. या कालमर्यादेचे काटेकोरपणे पालन सर्व संबंधित यंत्रणांनी करावयाचे आहे.
1. शासकीय परिसर/मालमत्तेचे विद्रूपीकरण - यात शासकीय परिसर ज्यात शासकीय इमारत व इमारत असलेले आवार, आवाराची संरक्षक भिंत यांचा समावेश असेल, यावरील झेंडे, इमारतीवरील भिंतीवरील लेखन, लावणेत आलेले पोस्टर्सं / भित्तीपत्रके, बॅनर्स इ. निवडणूक जाहीर झाल्यापासुन 24 तासात तातडीने काढून घेणेत यावीत.
2. सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण /परिसराचा गैरवापर - सार्वजनिक मालकीच्या इमारती / परिसर ( विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, पूल, शासकीय / निम शासकीय बसेस , वीज व दुरध्वनीचे खांब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती इ. ) या ठिकाणी असलेले सर्व प्रकारच्या अनधिकृत राजकीय. जाहिराती जसे झेंडे, इमारतीवरील भिंतीवरील लेखन, लावणेत आलेले पोस्टर्सं / भित्तीपत्रके, बॅनर्स इ. निवडणूक जाहीर झाल्यापासुन 48 तासात तातडीने काढून घेणेत यावीत.
3. खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण - स्थानिक नियमावली , कायदे , मा. न्यायालयाचे निर्देशाचे अधिन राहून सर्व प्रकारच्या अनधिकृत /विनापरवानगी करणेत आलेले राजकीय जाहिराती निवडणूक जाहीर झाल्यापासुन 72 तासात तातडीने काढून घेणेत यावीत.
4. वाहनांचा गैरवापर - आदर्श आचारसंहिता कालावधीत राजकीय पक्ष/ उमेदवार यांनी शासकीय / निमशासकीय वाहने प्रचारासाठी , निवडणूक कामकाजासाठी वापरणेस सक्त मनाई आहे. या अनुषंगाने संबंधित विभागप्रमुख / खातेप्रमुख यांनी मा.भारत निवडणूत आयोगाच्या निर्देशांची 24 तासात अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यावी.
5. शासकीय रक्कमेतून जाहिराती - आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय रक्कमेतून योजनांच्या जाहिराती, बातम्या , माहिती इ. वर्तमानपत्रे / इतर मिडीयाद्वारे करणेत येऊ नये कार्यालयीन मिडीयाचा राजकीय फायद्यासाठी वापर करणेत येऊ नये असे आयोगाचे सक्त निर्देश आहेत. तथापी आदर्श आचारसंहिता लागू होण्याआधीच अशा जाहिराती वर्तमानपत्राद्वारे/ मिडीयाद्वारे प्रसारित करण्यासाठी पाठविल्या असतील तर अशा जाहिरातीचे प्रसारण / प्रसिद्धी निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासुनच तातडीने थांबविणेत यावे.
6. शासनाच्या / वेबसाईटवर राजकीय पदाधिकारी यांचे फोटो संदर्भात करावयाची कार्यवाही - आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर शासनाच्या / शासकीय बेवसाईटवर राजकीय पदाधिकारी यांचे फोटो असल्यास तातडीने काढणेची कार्यवाही करणेत यावी.
7. विकास / बांधकाम विषयक बाबी - निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर त्वरीत जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणा यांनी तातडीने त्यांचे विभागामार्फत / खात्यामार्फत सुरू असलेली विकास कामे / बांधकामे तसेच अद्याप सुरू न झालेली विकास कामे / बांधकामे यांची सविस्तर यादी तयार करून कार्यारंभ आदेश नोंदवही दिनांकित स्वाक्षरी करून बंद करावी व कार्यारंभ आदेश नोंदवही उपरोक्त सदर यादीसह प्रमाणित करून निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी, आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे सादर करावी.
उपरोक्त निर्देशानुसार सूचनांची अंमलबजावणीची पुर्वतयारी सर्व संबंधित विभागांकडून करणेत यावी व आचारसंहिता लागू होताच अंमलबजावणीची दक्षता घेणेबाबत अवाहन करणेत येत आहे.
No comments:
Post a Comment