कृषी
यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने अनुदान तत्वावर
कृषी
औजारांसाठी अर्ज सादर करा
:
तालुका कृषी अधिकारी राजपूत
चाळीसगाव दि. 8 मे
(उमाका वृत्तसेवा) : सन 2017-18 या
वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती - समृध्द शेतकरी ही मोहिम
राबवून या मोहिमेतंर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य
शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी तालुका
समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या आढावा बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार सुधारित कृषी
औजारे शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी
तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी विहित प्रपत्रातील अर्ज कृषी विभागाकडे सोमवार
दिनांक 15 मे, 2017 पर्यंत सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेतंर्गत
ट्रॅक्टर, पावर टिलर, कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर इ. औजारे प्रती वैयक्तीक लाभार्थीस
एक औजार याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत सामुहिक अथवा गटनिहाय कृषी औजारे
बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्य सुध्दा देण्यात येणार आहे. दिनांक 15 मे, 2017 पर्यंत
प्राप्त झालेल्या अर्जांमधुन जिल्हा स्तरावर सोडत पध्दतीने निवड करुन पुर्वसंमती
देण्यात येणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या
गावाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी
अधिकारी यांचे कार्यालयाशी थेट संपर्क साधून या योजनेचा तालुक्यातील इच्छुक
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे
आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment