मतदानासाठी अंगणवाडी सेविकांना
प्रांताधिका-यांनी दिली शपथ
चाळीसगाव, दिनांक
16 एप्रिल :- मागील
मतदानाची कमी टक्केवारी पहाता महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी दिसुन आलेली
उदासिनता घालविण्यासाठी महिलांशी थेट संपर्क होणा-या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व
आरोग्य सेविकांचा मेळावा परदेशी बोर्डींग हॉल येथे आयोजित करुन त्यांना मतदान
करण्यासाठी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील
यांनी शपथ दिली. तसेच आपला संपर्क हा थेट महिला वर्गाशी होत असल्यामुळे निवडणुक
आयोगाच्या मतदार शिक्षण कार्यक्रम (sveep) च्या अनुषंगाने आपण प्रत्येक घरा-घरात
जाऊन महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व त्यांना मतदानासाठी
प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.
अंगणवाडी सेवीकांना मार्गदर्शन
करतांना प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील म्हणाले की, आपण दैनंदिन करित असलेल्या
कामकाजात जसे महिला व बालकांचे संगोपनाबाबत काम करित असतात त्याच पध्द्तीने या
बालकांच्याच भविष्यासाठी व लोकशाही मजबूत करण्यासाठी तसेच चांगले सरकार देण्यासाठी
आपण मतदान करा असा संदेश प्रत्येक महिला मतदारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही
त्यांनी यावेळी या महिला कर्मचा-यांवर सोपविली. त्याच बरोबर मतदानाच्या दिवशी
प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी मतदान
केंद्रावर जाऊन महिला पुरूषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यास मदत करणे, तसेच बाहेरुन
येणा-या मतदान केंद्रावरील कर्मचा-यांना योग्य त्या सोई-सुविधा पुरविण्यासाठी आवाहन केले.
तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक संपन्न
पोलीस पाटलांनी आपल्या पदनामातील पोलीस या
शब्दाची व्याख्या ओळखुन निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या उपक्रमातील शस्त्र साठा,
मद्य साठा व रोख रकमेची वाहतुक या विषयी काही बाबी आढळुन आल्यास महसुल व पोलीस
प्रशासनास अवगत करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक
संजय देशमुख यांनी केले यावेळी केले. त्याच बरोबर या निवडणुक कालावधीत रहिवास
दाखल्या प्रमाणेच इतर प्रकारचे दाखले देतांनाही काळजी घ्यावी व पोलीस पाटील या
नात्याने सर्वसामान्य नागरिकांशी आपला
संपर्क सातत्याने येत असल्याने आपणही नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करुन
आपल्या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहयोग करण्यासाठीचे आवाहन
केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment