लोकसभा निवडणुक 2014 करिता
चाळीसगांव महसुल व पोलीस प्रशासन सज्ज
चाळीसगाव, दिनांक 22 एप्रिल :- 24 एप्रिल, 2014
रोजी होणा-या लोकसभा निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर 017 चाळीसगांव मतदार संघातील
निवडणुकीसाठी महसुल व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी
तथा प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे
चाळीसगांव विधानसभा मतदार संघामध्ये एकुण 327 मतदान
केंद्रांची स्थापना करण्यात आली असून पैकी शहरी भागात 71 व ग्रामीण भागात 256 असे
एकूण 327 मतदान केंद्र स्थापीत करण्यात आलेले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर
मतदान केंद्राध्यक्ष-1, मतदान अधिकारी-3 पोलीस कर्मचारी-1 व शिपाई-1 या प्रकारे
कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रीयेमध्ये एकूण 20 उमेदवार
व 1 नोटा असे एकूण 21 उमेदवारांची संख्या असल्याने दोन बॅलेट युनिट व 1 कंट्रोल
युनिट असणार आहे. मतदान प्रक्रीया सुरु होण्याअगोदर प्रत्येक मतदान केंद्रावर
मॉकपॉल घेण्याच्या सुचना संबंधितांना यापुर्वीच देण्यात आलेल्या आहेत.
चाळीसगांव मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 3,14,888
इतकी असून पैकी पुरुष मतदार 1,69,001 व स्त्री मतदार 1,45,887 अशी आहे. मतदान
अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व आण्ण्यासाठी
वाहतुक आराखडयानुसार 42 बसेस, 8 मिनी बस, 22 जिप असे एकूण 72 वाहनांचे नियोजन
करण्यात आलेले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकुण 9 अधिकारी, 237
पोलीस कर्मचारी व 93 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पोलीस मुख्यालय,
जळगांव, चाळीसगांव, अमळनेर, मेहुणबारे व पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथुन
पोलीसांची कुमक मागविण्यात आली आहे. दिनांक 23 एप्रिल, 2014 रोजी चाळीसगांव
शहरातील राष्ट्रीय विद्यालय, हिरापुर रोड येथुन मतदान साहित्याचे वाटप करण्यात
येणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
या वेळी
प्रथमच मोठया प्रमाणात ई.डी.सी. व पी.बी. प्रमाणपत्राचे वाटप
मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त
केलेल्या अधिकारी कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रथमच मोठया प्रमाणात
ई.डी.सी. (निवडणुक कार्य प्रमाणपत्र) एकुण 1350 व पी.बी. (टपाली मतपत्रीका) एकूण 165 चे वाटप
करण्यात आले आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी हे जळगांव जिल्हयातील विविध तालुक्यातून
नियुक्त केल्याने मतदान संपल्यानंतर त्यांना त्यांच्या मुख्यालयी जाणेसाठी साहित्य
संकलन केंद्र राष्ट्रीय विद्यालय येथुन शेवटचा कर्मचारी जाईपर्यंत पेमेंट बेसिसवर
जादा बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याच बरोबर नियुक्त अधिकारी
कर्मचा-यांना 23 व 24 एप्रिल रोजीची भोजन व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आली
आहे. बाहेर तालुक्यातील मतदान अधिकारी कर्मचा-यांना बसच्या प्रवास भाडे रक्कमही
देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणा-या कामगारांना मतदान करण्यासाठी सुटी
जाहिर करण्यात आली असून. लोकसभा निवडणुकीसाठी पुर्ण वेळ सुटी देण्याच्या सुचना
कामगार कार्यालयाने दिल्या आहेत. कामगारांनीही मोठया प्रमाणात मतदान प्रक्रीयेत
सहभाग नोंदवून मतदान करावे असे आवाहनही सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे
पाटील यांनी केले आहे. यावेळी मतदान प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला असून
सकाळी 07:00 ते सायंकाळी 06:00 या वेळेत सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. तरी
मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून
लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय
अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज : पोलीस निरीक्षक संजय देशमुख
017 चाळीसगांव मतदार संघातील निवडणुकीसाठी
पोलीस प्रशासन सज्ज असून चाळीसगांव पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 218 मतदान केंद्र येत
आहेत. येथील निवडणुक कर्तव्यावर एकूण 9 अधिकारी, 237 पोलीस कर्मचारी व 93 होमगार्ड
असे एकूण 339 अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून पैकी प्रशिक्षणार्थी
पीएसआय 2 व स्थानिक अधिकारी 7, जळगांव पोलीस मुख्यालय-107, चाळीसगांव-35,
अमळनेर-40, मेहुणबारे-10, जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 35 व 10 महिला पोलीस
कर्मचारी व 93 होमगार्ड अशी कुमक मागविण्यात आल्याचे चाळीसगांव पोलीस निरीक्षक
संजय देशमुख यांनी कळविले आहे.
तर मेहुणबारे पोलीस हद्दीत एकूण 109 मतदान
केंद्र असून यासाठी एकूण 6 अधिकारी, 90 पोलीस कर्मचारी व 65 होमगार्ड असे एकूण 161
अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून पैकी स्थानिक 2 अधिकारी व 4 नाशिक
येथील प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी तर पोलीस कर्मचा-यांमध्ये 40 स्थानिक व 50
नागपुर रेल्वे पोलीस कर्मचारी, होमगार्ड मध्ये 20 स्थानिक व 45 भुसावळ असे एकूण
161 अधिकारी कर्मचारी निवडणुक कर्तव्यावर नियुक्त केल्याचे मेहुणबारे सहाय्यक
पोलीस निरीक्षक देवरे यांनी कळविले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदान प्रक्रीया
भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी तसेच
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चाळीसगांव पोलीस स्टेशनतर्फे शहरात
रुट मार्च काढण्यात आला असून मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा
हक्क बजवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सर्व मतदारांना केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment