सर्वाधिक मतदान होणा-या केंद्रावरील
बी.एल.ओ.चा गौरव करणार
: निवडणुक निरीक्षक व्हि.पलानी चामी
चाळीसगाव, दिनांक 13 एप्रिल :- लोकसभा
सार्वत्रिक निवडणुक 2014 च्या पार्श्वभुमीवर सर्वाधिक मतदान होणा-या केंद्राच्या
बी.एल.ओ. चा सर्वोत्कृष्ट बि.एल.ओ. म्हणुन प्रमाणपत्र देऊन गौरव करणार असल्याचे
प्रतिपादन निवडणुक निरीक्षक व्हि.पलानी चामी यांनी आज येथील हंस चित्रपट गृहात
आयोजित बि.एल.ओ.प्रशिक्षण शिबीरात केले. यावर्षी प्रथमच निवडणुकीमध्ये मतदान चिठ्ठीचे
वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज सर्व बी.एल.ओ. यांना मतदान
चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. तसेच मतदान चिठ्ठीचे वाटप करण्याच्या हेतुने प्रत्येक
घरा-घरापर्यंत जाऊन केवळ मतदान चिठ्ठी न देता संकल्प पत्र भरुन घेणे,
मतदानाविषयीचे महत्व मतदारांना पटवून देणे तसेच निवडणुक कामात तळागाळापर्यंत जाऊन
मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी बी.एल.ओ.नी यशस्वीपणे
पार पाडावी असे आवाहनही त्यांनी या प्रशिक्षण शिबीरात केले.
या प्रशिक्षण शिबीरास सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा
प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.व्हि.भोकरे, तहसिलदार
बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय
देशमुख, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार सुर्यवंशी यांच्या सह सेक्टर
ऑफीसर, एन.जी.ओ., कॅम्पस ॲम्बेसेडर व बी.एल.ओ. मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रथम मार्गदर्शन करतांना श्री.चामी म्हणाले की, मतदान
चिठ्ठी वाटपाचे काम संवेदनशिल असून एक गठ्ठा स्लिपा कुणाकडेही सोपवू नका तर
प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्यांचे वाटप करा या निमीत्ताने मतदारांमध्ये जनजागृती करण्याची
संधी आपल्याला मिळाली असून आपल्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी कशी वाढेल
यासाठी मनापासून काम करा व बेस्ट बी.एल.ओ. च्या स्पर्धेत उतरा. भारतात महाराष्ट्र्
हे प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते तरी या प्रगत राज्यात मतदानाची टक्केवारी वाढवून
राज्याच्या प्रगतीमध्ये हात भार लावा. असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
बी.एल.ओ.नी निवडणुक कामात कुचराई करु नये : प्रांताधिकारी मनोज
घोडे पाटील
बी.एल.ओ.
यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ओळखुन कामाला लागावे, मतदान चिठ्ठी
मिळाली नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित बी.एल.ओ.वर कायदेशीर कारवाई
करण्यात येईल. तसेच प्रत्येक मतदारांनी आपल्याला मतदान चिठ्ठी न मिळाल्यास तहसिल
कार्यालयातील आचार संहिता कक्षाशी संपर्क साधावा अथवा आचार संहिता कक्षाचा
दुरध्वनी क्रमांक 02589-224022 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन सर्व
मतदारांना सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
श्री.चामी यांनी बी.एल.ओ. प्रशिक्षणानंतर सर्व सेक्टर
अधिकारी, कॅम्पस ॲम्बेसेडर, एन.जी.ओ. यांच्याशी संवाद साधुन त्यांनी केलेल्या पुर्वतयारीचा
आढावा घेतला व सविस्तर मार्गदशनही केले. त्यानंतर श्री.चामी यांनी शासकीय
विश्रामगृहात संपुर्ण पोलीस यंत्रणेची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा
घेतला. त्यानंतर शहरातील अंधशाळेतील मतदान केंद्रास तसेच पातोंडा व वाघळी येथील
काही मतदान केंद्रांची पहाणी करुन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. शेवटी लोकसभा
निवडणुक कामकाजात चाळीसगांव प्रशासनाने केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन
निवडणुक कामासाठी शुभेच्छाही दिल्या.
No comments:
Post a Comment