खर्च करा पण नियमाला धरून !
: खर्च
निरीक्षक शंकरलाल भलोटीया
चाळीसगाव, दिनांक 1
एप्रिल
:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या पार्श्वभुमीवर निवडणूक खर्च संनियंत्रण
आढावा बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्यात आले होते. या आढावा बैठकीत
मार्गदर्शन करतांना उमेदवारास व राजकीय पक्षांना विविध बाबींवर खर्च करावा लागतो.
मात्र हा खर्च आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेत व नियमानुसार करणे आवश्यक असून
निवडणुकीदरम्यान केलेल्या प्रत्येक खर्चाची व्यवस्थीत व सुयोग्य नोंद ठेवणे गरजेचे
असल्याचे निवडणुक खर्च निरीक्षक शंकरलाल भलोटीया यांनी यावेळी सांगितले.
यावेळी
सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे, उपविभागीय अधिकारी मनोज घोडे, तहसिलदार
बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय
देशमुख, मेहुणबारे सहा.पोलीस निरीक्षक विजय देवरे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे,
निवासी नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी, ए.एम.परमार्थी आदि उपस्थित होते.
श्री.भलोटीया
मार्गदर्शक करतांना म्हणाले की व्हिडीओ सर्वेक्षण पथक, फिरते भरारी पथकांनी आपले
कर्तव्य बजावतांना मतदारांमध्ये जागृती
आणून मतदारांना प्रलोभनासंदर्भात 1 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते याची जाणीव
करुन देणे तसेच या संदर्भात समाजातील सर्व थरात जनजागृती करणे तसेच कुठल्याही
भुलथापांना बळी न पडता भयमुक्त वातावरणात मतदान करावे अशा प्रकारचे संदेश देण्याचे
आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच
चित्रीकरणासाठीच्या मुलभूत सुचना, अपेक्षीत असलेले चित्रीकरण, प्रचार सभेत उमेदवार
व पक्ष यांचा सुक्ष्म अभ्यास करुन खर्चाचे वर्गीकरण करणे, तालुका स्तरावर दुय्यम
शॅडो रजिष्टर अद्यावत करणे या सारख्या सुचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.
सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मतदार संघातील
निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आलेल्या संपुर्ण कामकाजाची माहिती निवडणूक खर्च
निरीक्षक शंकरलाल भलोटीया तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक ईश्वर घोडे यांना दिली. तसेच
तालुक्यात नेमण्यात आलेल्या रोहिणी, चिंचगव्हाण व जांभडी प्र.ब. येथे नेमण्यात
आलेल्या चेक पोस्ट वरील अधिकारी कर्मचा-यांनी कुठल्याही वाहनाची तपासणी करतांना
वाहन धारकास त्रास व विलंब होणार नाही यांची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच
आयोजित करण्यात येणा-या सभा, बैठका, रॅलीचे चित्रीकरण करतांना सदर सभा, बैठका,
रॅलीवर होणा-या खर्चाचे वर्गीकरण करण्यास अपेक्षीत असलेल्या चित्रीकरणाविषयी
त्यांनी मार्गदर्शन केले.
चिंचगव्हाण चेक पोस्टची खर्च निरीक्षकांनी केली पहाणी
सदर आढावा बैठकीनंतर निवडणुक खर्च निरीक्षक शंकरलाल
भलोटीया यांनी चिंचगव्हाण फाटयावरील चेक पोस्टची पहाणी केली यावेळी प्रांताधिकारी
मनोज घोडे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड,
यांच्यासह महसुल व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या पहाणी
दरम्यान भलोटीया यांनी चेकपोस्ट वरील कामकाजाची माहिती जाणून घेतली व योग्य त्या
सुचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्यात.
* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व
छायाचित्र हे खालील संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment