आदर्श
आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा !
: प्राताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगाव/पाचोरा, दिनांक 07
मार्च
:- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे लोकसभा निवडणूक 2014 ची आचार संहिता
सर्वत्र लागू झाल्याने उप विभागीय अधिकारी
पाचोरा गणेश मिसाळ यांनी पाचोरा
विधानसभा मतदार संघात येणा-या सर्व पोलीस पाटील, ग्रामसेवक, व स्थानिक
केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी.एल.ओ. यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज बैठकीचे
आयोजन केले होते. या बैठकीत मार्गदर्शन
करतांना आदर्श आचार संहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन
ऑफ डिफेंसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी
निर्गमीत केलेले आदेश व निर्देशांची
माहिती देऊन या निर्देशानुसार सार्वजानिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा
लिहीणे, निवडणूक चिन्ह लिहीणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर
मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष अथवा
उमेदवारांनी सार्वजानिक मालमत्ता
विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी
फलक, व चिन्ह इ.काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी अन्यथा उपरोक्त नियमानुसार सार्वजानिक मालमत्ता
विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यत दंड अथवा
दोन्ही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील याची नोंद घ्यावी. असे प्रांताधिकारी गणेश
मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
त्याच
बरोबर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचार संहिता लागल्यानंतर पहिल्या रविवारी
म्हणजेच दिनांक 09 मार्च, 2014 रोजी
मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले
आहे. तरी मतदार संघातील ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ नाहीत ती नावे
मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन फॉर्म नमुना न.6
भरुन संबंधित बी.एल.ओ.कडे सादर करावा , अशा उमेदवारांची पुरवणी यादी तयार करण्यात
येऊन लोकसभा निवडणूक-2014 मध्ये त्यांना मतदान करण्याचा हक्क प्राप्त होणार आहे.
तरी या संधीचा मतदार संघातील जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहनही
प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे. तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव
आहे परंतु छायाचित्र नाही अशा मतदारांनी आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यामागे
आपले संपुर्ण नाव, पत्ता व यादी भाग क्रमांक नमुद करुन संबंधित बी.एल.ओ. यांचेकडे
जमा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी गणेश मिसाळ
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment