Friday, 28 March 2014

(04) रावेर लोकसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम

(04) रावेर लोकसभा मतदार संघाचा
निवडणूक कार्यक्रम

        जळगाव, दि. 28 :- (04) - रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. 29 मार्च, 2014 पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. दि. 5 एप्रिल, 2014 पर्यंत सार्वजनिक सुटी व्यतिरीक्त सकाळी 11-00 ते दुपारी 3-00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी, (04) - रावेर लोकसभा मतदार संघ किंवा श्री. विकास गजरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी  (04) - रावेर लोकसभा मतदार संघ यांच्या कार्यालयात दाखल करता येईल.  नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.
            नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 7 एप्रिल, 2014 रोजी सकाळी 11-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे असलेल्या  निवडणुक निर्णय अधिकारी (04) -रावेर लोकसभा मतदार संघ यांच्या कार्यालयात होईल  उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला किंवा (उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या) निवडणूक प्रतिनिधीला वरील निर्देशित कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दि. 9 एप्रिल, 2014 रोजी दुपारी 3-00 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविण्यासाठी दि. 24 एप्रिल, 2014 रोजी सकाळी 7-00 ते सायंकाळी 6-00 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे (04) - रावेर  लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  गुलाबराव खरात यांनी कळविले आहे.

* * * * * * * * *

No comments:

Post a Comment