गारपीटीने
अवकाळी पावसात मयत शेतक-याच्या
वारसांना
मदतीचा धनादेश प्रदान
: प्रांताधिकारी गणेश मिसाळ
चाळीसगाव/पाचोरा, दिनांक 14 मार्च :-
पाचोरा तालुक्यातील मौजे कु-हाड खु. येथील
शेतकरी कै.अर्जुन सुकदेव पाटील हे दिनांक 08.03.2014 रोजीच्या गारपीटीने झालेल्या
अवकाळी पावसात मयत झाले होते. तरी
कै.अर्जुन सुकदेव पाटील यांचे वारस त्यांच्या पत्नी श्रीमती बेबाबाई अर्जुन
पाटील यांना शासनामार्फत नैसर्गिक आपत्तीतून मदत म्हणून रु.1,50,000/- (अक्षरी
रक्कम रुपये एक लाख पन्नास हजार) इतक्या रकमेचा धनादेश आज पाचोरा प्रांताधिकारी गणेश
मिसाळ यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला यावेळी पाचोरा तहसिलदार गणेश मरकड, निवासी
नायब तहसिलदार आबा महाजन, नायब तहसिलदार राजेंद्र नजन, कु-हाड गावचे तलाठी
ए.यु.ठाकरे आदी उपस्थित होते.
कै.अर्जुन
सुकदेव पाटील यांच्या वारसांना तहसिलदार, पाचोरा यांच्या दिनांक 10.03.2014 च्या
आदेशानुसार सदर रक्कम त्यांना अदा करण्यात आली या व्यतिरीक्त आम आदमी विमा योजनेचा
रु. 75000/- इतक्या रकमेचा तसेच शेतकरी अपघात विमा योजनेचा रु.1 लाखाचा प्रस्ताव
हा सर्व कागदपत्रांसह मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून लवकरच त्यांना विमा
योजनेच्या लाभाची रक्कमही प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मिसाळ
यांनी कळविले आहे
* * * * * * * *
No comments:
Post a Comment