Saturday, 1 March 2014

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या पुर्व तयारीसाठी बी.एल.ओ.चे प्रशिक्षण शिबीर संपन्न

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या
पुर्व तयारीसाठी बी.एल.ओ.चे प्रशिक्षण शिबीर संपन्न

            चाळीसगाव, दिनांक 01 मार्च :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या पुर्वतयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) यांच्या साठी एकदिवसीय शिबीराचे आयोजन येथील हंस चित्रपट गृहात तालुका प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीरास मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी उपस्थित असलेल्या बी.एल.ओ. यांना मार्गदर्शक सुचना दिल्या, यावेळी  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार निवडणूक सुर्यवंशी यांच्यासह कर्मचारी व केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मोठया संख्येने उपस्थित होते.
            भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 ची घोषणा केल्यानंतर म्हणजेच आचार संहिता लागू झाल्यानंतर पहिल्या रविवारी सर्व बी.एल.ओ. यांनी आपल्या भागाच्या यादीसह मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देऊन मतदान केंद्रावर मतदार यादी भागाचे व वगळणीयादीचे वाचन करणे आणि नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीकामी फॉर्म नमुना नं.6, दुरुस्तीसाठी फॉर्म नमुना नं.8, स्थलांतरासाठी फॉर्म नमुना नं. 8-अ इत्यादी फॉर्म  अचुक असल्याची खातरजमा करुन स्विकारण्याच्या सुचना दिल्या.
            या प्रशिक्षण शिबीरात केंद्रस्तरीय अधिका-यांना मार्गदर्शन केल्यानंतर संपुर्ण माहितीचे प्रोजेक्टरच्या माध्यमाने स्लाईड शो दाखविण्यात आला. व त्यानंतर बी.एल.ओ. यांच्याशी प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सुसंवाद साधून कामात येणा-या अडचणी समजावून घेतल्या. बी.एल.ओ. यांना सदर कामकाजाकरिता मिळत असलेले मानधन कमी असल्यामुळे ते वाढवून मिळावे अशी विनंती बी.एल.ओ.नी केली तर तशा मागणीचे निवेदन सादर करण्याच्या सुचनाही प्रांताधिका-यांनी  संबंधितांना यावेळी  दिल्या.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment