निरिक्षकांनी घेतला मतदार जनजागृतीविषयक
उपक्रमांचा आढावा
जळगाव, दि.24- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात मतदानाची
टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृतीविषयक उपक्रमांचा आढावा मतदार जनजागृती
निरिक्षक तथा संचालक वृत्त आकाशवाणी चेन्नाई व्ही पलानीचामी यांनी आज घेतला. मतदार
जनजागृतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या
स्विप (SVEEP- Systematic Voters Education & Electoral Participation)
मतदाता शिक्षण व सहभागीता कार्यक्रम समितीचा आढावा त्यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी श्रीमती रुबल
अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, अति. जि. प. जळगाव मुख्य कार्यकारी
अधिकारी सुनिल गायकवाड, , प्रकल्प संचालक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शुक्राचार्य
दुधाळ, प्रांताधिकारी अंतुर्लिकर, समाज कल्याण अधिकारी प्रशांत चव्हाण, महिला बाल
विकास अधिकारी देवेंद्र राऊत, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) शशिकात हिंगोणेकर,
शिक्षणाधिकारी प्राथमिक शिवाजीराव पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी,
माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र जळगाव विजय
सपकाळे , समिती सदस्य विजय पाठक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या
चावडीवर मतदार यादी वाचन, शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांचे संकल्प पत्र
भरुन घेणे अशा उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल यांनी दिली.
यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. पलानी चामी यांनी आता पर्यंत मतदार
नोंदणीसाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर उपक्रमांचे कौतूक करुन आगामी काळात विविध
यंत्रणांमार्फत मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्याच्या सुचना केल्या.
त्यासाठी शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या या सारख्या प्रत्यक्ष जनतेच्या संपर्कात असणा-या यंत्रणेमार्फत संदेश
द्यावा, अशा सुचना दिल्या. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मनोहर चौधरी यांनी केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment