Tuesday, 18 February 2014

चारित्र्यसंपन्न माणूस घडविते ते शिक्षण : शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचे प्रतिपादन


चारित्र्यसंपन्न माणूस घडविते ते शिक्षण
शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचे प्रतिपादन

चोपडा, जि. जळगाव, दि.18- माणसाच्या आयुष्यात होणा-या बौद्धिक विकासा पैकी 80 टक्के विकास हा शालेय जीवनातच होतो. या वयात मिळालेले शिक्षण आणि संस्कार हे पुढील आयुष्यात कामात येतात. म्हणूनच चारित्र्यसंपन्न माणूस घडविते तेच खरे शिक्षण, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. चोपडा येथील भगिनी मंडळ व्हॉलिंटरी स्कूल चा सुवर्ण महोत्सवी समारंभ आज पार पडला. त्यावेळी त्या  बोलत होत्या.
 या सोहळ्याच्या उदघाटनासाठी उदघाटक म्हणून सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास    ( औकाफसह) राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान या उपस्थित होत्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी  उपस्थित होते.
याप्रसंगी  राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान म्हणाल्या की, केवळ गुण प्राप्त करणे हे शिक्षण नाही. परंतू आज समाजात दुर्देवाने त्यालाच महत्त्व दिले जाते. जीवनासाठी सज्ज माणूस तयार करण्याचे काम शिक्षण करते. शाळांमध्ये आदर्श व्यक्तिमत्व घडवावीत जी समजाला प्रेरणादायी ठरतील.
या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेशदादा पाटील, आ. जगदिशचंद्र वळवी, माजी आ.दिलीप सोनवणे, नगराध्यक्ष संदीप पाटील, चोपडा पंचायत समितीचे सभापती डी.पी.साळुंखे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  शिवाजीराव पाटील, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुशिला शाह, सचिव उर्मिला गुजराथी, सुवर्ण महोस्तव समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र शिरसाठ, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी ,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ओलावा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच याप्रसंगी  विद्यालयाच्या प्रथम शिक्षिका, तसेच माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. सुशिला शाह  यांनी ,आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रभावती पाटील यांनी  केले तर सूत्रसंचलन पोर्णिमा हुंडीवाले यांनी केले.

                                                                 * * * * * * * * *

1 comment:

  1. very Good. I just went through your Blog. Its definately a good initiative. Keep it up

    Anirudha Ashtaputre
    Pro to Hon CM

    ReplyDelete