Friday, 7 February 2014

राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनातील बाधित शेतक-यांना मोबदला मिळवून देणार:आमदार राजीव देशमुख



राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनातील
बाधित शेतक-यांना मोबदला मिळवून देणार
                                                                :आमदार राजीव देशमुख

            चाळीसगाव, दिनांक 07 :-  रा.म.मार्ग क्रं.211 औरंगाबाद-धुळे या मार्गाचे चौपदरीकरणामुळे बाधित होणा-या शेतक-यांना शासन स्तरावर प्रयत्न करुन मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत असे आमदार राजीव देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. या प्रसंगी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे-पाटील, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, प्रकल्प संचालक एस.पी.खलाटे, उपअधिक्षक भुमी अभिलेख आर.आर.यशोद, या कामकाजासाठी गठीत केलेल्या समिती सदस्य, ॲड.पवार, ॲड.किर्ती पवार, ॲड.मनोज पाचपोळ, शेषराव पाटील मिलींद शेलार आदि मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी आमदार देशमुख यांनी भुसंपादन कामकाजाचा संपुर्ण आढावा घेऊन संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व ज्यांचे मार्फत भुसंपादनाचे दावे दाखल झाले आहेत त्या अभियोक्त्यांची तसेच ज्या लाभधारक शेतक-यांचा मोबदला व वाढीव मोबदला प्रलंबीत आहे अशा शेतक-यांची सद्यस्थिती बाबतची माहिती एक आठवडयात तपशिलवारपणे पुर्ण करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी यांना दिल्यात. प्रलंबित भुसंपादनाचा मोबदला व वाढीव मोबदला संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करुन अंतिमरित्या कार्यवाहीसंबंधी प्रयत्नशील राहून बाधीत शेतक-यांना त्यांच्या भुसंपादन मोबदल्याची रक्कम मिळवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार राजीव देशमुख यांनी या बैठकीत दिले.
            तसेच 1988 मध्ये झालेल्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा देखील प्रलंबित वाढीव मोबदलाच्या मागणीसाठी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल आमदार देशमुख यांनी त्यांचे अभिनंदण केले. राष्ट्रीय मार्गातील अडथळा दुर करुन दळणवळणाच्या महत्वपुर्ण कामासाठी सर्व बाधीत शेतक-यांना गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातुन न्याय मिळवून देण्यास आपण कटिबध्द असल्याचेही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.

* * * * * * * *

कृषि वसंत 2014 या कृषि प्रदर्शनाचे
कृषि उत्पन्न बाजार समिती चाळीसगावं येथे थेट प्रक्षेपण

चाळीसगाव, दिनांक 07 :-  देशातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन कृषि वसंत 2014  हे नागपूर येथे दिनांक 09 ते 13 फेब्रुवारी,2014 दरम्यान भरविण्यात येत असून तालुक्यातील शेतक-यांना या कृषि प्रदर्शनाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ होण्यासाठी चाळीसगाव कृषि उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. कृषि प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण हे दिनांक 09 ते 13 फेब्रुवारी, 2014 या दरम्यान सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत प्रसारण करण्यात येणार असून त्यासाठी बाजार समितीने 200 शेतक-यांची बैठक व्यवस्था केली आहे. प्रसारणासाठी 54 इंची प्लाझमा प्रोजेक्शन टिव्हीची उभारणी केली असून परिसरातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत कळविण्यात आले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने शासनाचा पुढाकार, परिसंवाद व चर्चासत्र, कृषि विषयक प्रात्यक्षिके, शेतक-यांच्या यशोगाथा, आतंराष्ट्रीय तज्ञ प्रतिनिधींचा सहभाग, सांस्कृतीक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असे प्रमुख वैशिष्टये  या कृषि प्रदर्शनाची असुन तालुक्यातील शेतक-यांनी या प्रदर्शनाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहिदास पाटील यांनी केले आहे.
* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व छायाचित्र हे  खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* * * * * * * *

No comments:

Post a Comment