Tuesday, 25 February 2014

मस्त्यव्यवसायाच्या ठेकाची रक्कम 30 एप्रिल पूर्वी जमा करावी

मस्त्यव्यवसायाच्या ठेकाची रक्कम 30 एप्रिल पूर्वी जमा करावी

             जळगाव, दि. 25 :- जळगाव जिल्हयातील पाटबंधारे विभागाचे तलाव मत्स्यव्यवसायासाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, खाजगी व्यक्तीना सन 2014-15 वर्षाकरीता ठेक्याने दिल्या आहेत.
           दि. 22 ऑक्टोंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार मत्स्यपालन सहकारी संस्था, खाजगी व्यक्तीकडे ठेक्याने मत्स्यव्यवसायासाठी असलेल्या पाटबंधारे विभागच्या तलावांची ठेक्का रक्कम दिनांक 30 एप्रिल   पर्यंत शासनाकडे जमा करणे बंधनकारक आहे. 30 एप्रिल पर्यंत तलाव ठेका रक्कम शासनाकडे जमा करणार नाही अशा तलावांचा तलाव ठेका मुदत पूर्व समाप्त करण्यात येईल. कोणत्याही कारणास्तव विलंब आकार किंवा मुदत वाढवून तलाव ठेका रक्कम स्विकारण्यात येणार नाही. असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * * *

डाक अदालत 18 मार्च रोजी

            जळगाव, दिनांक 25 :- पोस्टाच्या टपाल, स्पीड- पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बॅक, मनीऑर्डर आदि कामासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिक्षक डाकघर जळगाव येथे दिनांक 18 मार्च 2014 रोजी दुपारी  2.30 वाजता  डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
              पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे सहा आठवडयाच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल डाक अदालतमध्ये घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी   आपली तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सेक्रेटरी, डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, मुंबई जी. पी ओ बिल्‍िडंग दुसरा माळा, मुंबई  यांच्या नांवे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 1 मार्च 2014 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी  संबंधितानी डाक अदालतीचा लाभ घ्यावा  असे आवाहन  चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी केले आहे.                                                      
* * * * * * *

No comments:

Post a Comment