Thursday, 20 February 2014

सेवाविषयक जातीदावा प्रस्ताव विशेष त्रुटी पूर्तता मोहिम आजपासून

सेवाविषयक जातीदावा प्रस्ताव
विशेष त्रुटी पूर्तता मोहिम आजपासून
                            
             जळगाव, दि. 20 :- विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 2 नाशिक, मुख्यालय धुळे, यांच्याकडे माहे जुन व जुलै 2013 मध्ये जमा करण्यात आलेल्या सेवा विषयक जातीदावा प्रस्तावांवर समितीचा निर्णय झालेला आहे. यात काही जातीदावा प्रस्तावांमध्ये त्रुटीअथवा उणिवा आढळून आलेल्या आहेत. अशा जातीदावा प्रस्तावांची यादी www.barti.cdac.in  या संकेत स्थळावर त्रुटीसह प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
             त्रुटी अथवा उणिवा असलेला जातीदावा प्रस्तावांसाठी  समिती कार्यालयामार्फत त्रुटी पुर्तता विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही मोहिम दिनांक 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी  10.30 ते सायं. 6.00 वाजे पर्यंत अखंड राबविण्यात येईल. संबधितांनी आपल्या जातीदावा प्रस्तावातील त्रुटी समिती कार्यालयात जमा करुन या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. तसेच दिनांक 30 जुलै 2013 च्या शासन निर्णयानुसार सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना वैधता प्रमाणपत्राची आवश्यक नसल्याने अशा अर्जदारांच्या जातीदावा प्रस्तावावर समिती निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा अशा कर्मचा-यांनी समिती कार्यालयात चौकशी करु नये. वैधता प्रमाणपत्रांचे वाटप देखील समिती कार्यालयात सुरु आहे. असे आवाहन समितीचे अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ, उपायुक्त तथा सदस्य साहेबराव जाधव तसेच संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव राकेश पाटील यांनी केले आहे. 

* * * * * * * *

हरभरा पिकावरील किड रोग नियंत्रणासाठी
कृषी विभागाचा मार्गदर्शनपर सल्ला

           जळगाव, दि. 20 :- जळगाव, भुसावळ, यावल, रावेर , मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील हरभरा पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत  हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी कृषी
विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे.- 
            हरभरा : मर – मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला असून नियमित निरीक्षणे घेवून रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करुन पुढील प्रादुर्भाव पसरणार नाही,
            हरभरा : मर – मरग्रस्त झाडे मुळासकट (मातीसकट) उपटून जाळून नष्ट केल्याने पुढील प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव होईल. पाण्याची पाळी देण्यापूर्वी प्रति हेक्टरी 20 ते 25 किलो शेणखत 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळून टाकल्यास प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.  

* * * * * * *

आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार – 2014

           जळगाव, दि. 20 :- जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत जळगाव जिल्हयात  कार्यरत अंगणवाडी सेविकांना अत्युकृष्ट काम केल्याबद्दल आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी 2014 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद जळगाव, छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
          सदरचा पुरस्कार सन 2012 – 13 यावर्षासाठी देण्यात येणार आहे.  जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, यांचे अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.  कार्यक्रमाचे उदघाटन सौ. लिलाताई भिलाभाऊ सोनवणे, सभापती महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद जळगाव यांचे हस्ते होणार असून, शीतल उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment