जळगांव, दि. 14 :- महाराष्ट्र राज्य
मुख्य माहिती आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाड, यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 19 फेब्रुवारी 2013
रोजी सकाळी 8-00 वाजता धुळे येथुन शासकीय वाहनाने चाळीसगांव जिल्हा जळगांवकडे
प्रयाण, सकाळी 10-00 वाजता माहिती
अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी
तसेच बी. डी. ओ. पंचायत समिती, तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे चर्चा, दुपारी 2-00
वाजता चाळीसगांव येथुन शासकीय वाहनाने जळगांवकडे प्रयाण, दुपारी 3-00 वाजता अजिंठा
विश्रामगृह जळगांव येथे आगमन व राखीव, दुपारी 4-00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संशोधन व प्रशिक्षण संस्था यांनी समाजातील उपेक्षित वर्ग आणि माहितीचा अधिकार
अधिनियम 2005 या विषयावर जिल्हाधिकारी जळगांव यांचे कार्यालयात आढावा बैठक,
संध्याकाळी 7-00 वाजता जळगांव येथुन शासकीय वाहनाने नाशिककडे प्रयाण
No comments:
Post a Comment