Wednesday, 25 April 2012

शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीसशिप) व्यवसाय परिक्षेबाबत आवाहन

जळगांव, दि. 25 - शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटीसशिप) योजने अंतर्गत मे 2012 मध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली ( एन.सी.टी.व्ही.टी ) मार्फत घेण्यात येणारी शिकाऊ उमेदवारांची 96 वी अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा दि. 9 मे 2012 ते 16 मे 2012 या कालावधीत मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी परिक्षेस बसणा-या शिकाऊ उमेदवारांनी संबंधित आस्थापनांच्या मालकांनी याची नोंद घ्यावी संबंधित शिकाऊ उमेदवारांनी परिक्षेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावीत. असे अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment