Monday, 2 December 2024

जागतिक एड्स नियंत्रण दिनी प्रभातफेरी व पोस्टर्स प्रदर्शन, पथनाटयाचे आयोजन



जळगाव, दिनांक 02 डिसेंबर (जिमका) : १ डिसेंबर २०२४ हा जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरावाडा म्हणून पाळला जातो. या निमित्ताने युवावर्ग व सामान्य जनतेमध्ये एच. आय. व्ही/ एड्स विषयी माहिती व एच. आय. व्ही विषयी असलेले गैरसमज दुर करण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती, सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या तर्फे प्रभातफेरी, पोस्टर्स प्रदर्शनाचे व पथनाट्याचे विशेष आयोजन शासकिय वैदयकिय महाविदयालय व रुग्णालय आवारामध्ये करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अति. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय डॉ. आकाश चौधरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव येथील अॅड शिल्पा रावेरकर, शासकिय आयुर्वेद महाविदयालयाचे मा.डॉ. दव्हेकर, कबचौ उमवि राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. सचिन नांद्रे, कबचौ सामाज कार्य महाविदयालयाचे डॉ. मनोज इंगोले, शासकिय नर्सिंग महाविदयालयाचे प्राचार्य श्रीमती नेतकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, वैदयकिय अधिकारी डॉ. रेश्मा उपाध्ये, डॉ. अनुपमा जावळे मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.संजय पहूरकर यांनी केले. जागतिक एड्स दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कार्यालयातंर्गत जिल्हयात सुरु असलेल्या विविध सुविधा केंद्राची तसेच एच. आय. व्ही सह जीवन जगणा-या सर्व व्यक्तींना मोफत औषधोपचार, तपासणी व अधिकारांबाबत माहिती देण्यात आली. विनोद ढगे व त्यांच्या पथकाने दिशा बहुउददेशीय संस्था, जळगाव यांच्या मार्फत महाराष्ट्र गीत गायन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सामाजकार्य महाविदयालय शाखा, कवयित्री बहिणवाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव यांच्यावतीने एचआयव्ही/एड्‌स विषयी प्राध्यापक डॉ. श्री. मनोज इंगोले व विदयार्थी यांनी फ्लॅश मॉब व पथनाटय कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सर्वांना एचआयव्ही/एड्स विषयी शपथ देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते एचआयव्ही प्रतिबंधात्क चिन्ह फुग्यांसह आकाशात सोडून प्रभातफेरीस हिरवा झेंडी दाखविण्यात आला व प्रभातफेरी मार्गस्थ करण्यात आली.

सदर प्रभातफेरीमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथील डॉ. आर. एम. गवारे, डॉ. विशाल देशमुख, डॉ. के.वी.पटील, डॉ. गणपत धुमाळ, डॉ. तनबिर खान, डॉ. भारती गायकवाड, डॉ. मनोज इंगोले, अनिल बेलसरे, शासकिय नर्सिंग महाविदयालयाच्या प्राचार्य श्रीमती कविता नेतकर, तृप्ती मेढे, सविता साळुखे, अक्षय दाभाडे, परविन मुसादी, रामा प्रसाद, सविता साळुंखे तसेच कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना, समाजकार्य महाविदयालय, नुतन मराठा महाविदयालय, एम जे. महाविदयालय, डी. एन. समाजकार्य महाविदयालय, बेंडाळे महिला महाविदयालय, एस. एस. मणियार महिला महाविदयालय, शिरिष मधुकरराव चौधरी विज्ञान महाविदयालय, तसेच शहरातील माध्यमिक शाळा पी. के. गुळवे, अॅग्लो उर्दू विदयालय प्रतापनगर, आर. आर विदयालय, भाऊसाहेब राऊत विदयालय येथील शिक्षकवृंद व विदयार्थी-विदयार्थीनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment