Thursday, 5 September 2024

राजधानीत संत चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी

                        
            राजधानीत संत चक्रधर स्वामी यांची 
जयंती साजरी

            नवी दिल्ली5: महान संत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक  संत चक्रधर स्वामी यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.


कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी संत चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैनसहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून स्वामींना आदरांजली वाहिली.


महाराष्ट्र परिचय केंद्रात संत चक्रधर स्वामी यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून स्वामींना आदरांजली वाहिली.

0000


No comments:

Post a Comment