प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२५
प्रस्तावास 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
जळगाव दिनांक
12 सप्टेंबर,2024 (जिमाका वृत्त) : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार
दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व
१८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक
कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार
दिला जातो.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२५ करीता केंद्र शासनाने अर्ज
मागविले आहेत. सदरचे अर्ज (https://awards.gov.in) या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने
स्विकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय ५ वर्षा पेक्षा अधिक व १५ सप्टेंबर, २०२४ रोजी
१८ वर्षा पेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण
शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे
प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित
प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था,
शैक्षणिक संस्था इत्यादी अर्ज करु शकतात. राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सदर पुरस्कार ऑनलाईन स्वीकारण्याची अंतिम तारीख १ एप्रिल, २०२४ ते ३१
जुलै, २०२४ पर्यंत होती मात्र त्यामध्ये वाढ करुन अंतिम तारीख दिनांक १५ सप्टेंबर,
२०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, असे आवाहन डॉ.वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment