107 प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप
जळगाव, दिनांक 19 सप्टेंबर ( जिमाका ) : शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आहे. मन लावून विद्यार्थ्यांना शिकवा, हे तुमच्याही भविष्याला आकार देणारे प्रशिक्षण असेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी कानळदा सरपंच पुंडलिक सपकाळे, विस्तार अधिकारी शेख खलील, गट शिक्षणाधिकारी सरला पाटील,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, ग. स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, विजय पवार, वंदना मोरे, प्राजक्ता टोके, गणेश काळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रभारी केंद्रप्रमुख नितेश कोळी यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मानले.
No comments:
Post a Comment