निवडणूक कामात हयगय करणा-यांवर कठोर कारवाई करणार !
:जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
चाळीसगांव,दिनांक 04 :- विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या कामकाजात हयगय करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कठोर
कारवाई करणार असल्याची तंबी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी 017-चाळीसगांव मतदार संघाच्या निवडणूक
कामकाजाच्या आढावा बैठकीत दिली. यावेळी चाळीसंगाव तहसिल कार्यालयात आयोजित निवडणूक
आढावा बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी
बाबासाहेब गाढवे, गट विकास अधिकारी मालती जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख,
मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव आदि
उपस्थित होते.
प्रारंभी श्रीमती अग्रवाल यांनी मतदार जनजागृती साठी तयार
करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मतदार जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
केला व लोकसभेच्या तुलनेत विधानसभा सार्वत्रीक निवडणूकीत किमान 75 टक्क्यापेक्षा
अधिक मतदान होईल असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी श्रीमती अग्रवाल यांनी निवडणूक कालावधीत कायदा व
सुव्यवस्थेचा आढावा घेऊन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना आवश्यक त्या सुचना
केल्या तर गट विकास अधिकारी यांना स्वीप-2 कार्यक्रमाचे योग्य नियोजन करुन मतदार
जनजागृती करण्याच्या व महिला मतदारांमधील मतदानाविषयी असलेली उदासिनता
घालविण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना केल्या. चाळीसगांव तालुका
हा नाशिक, धुळे व औरंगाबाद या तिनही जिल्हयांना जोडला गेला आहे, तसेच येथे रेल्वे
मार्ग असून रेल्वेचे जंग्शन स्टेशन आहे. त्या अनुषंगाने भरारी पथकांनी योग्य
नियोजन करुन चोख बंदोबस्त ठेवणे अपेक्षीत आहे. त्या अनुषंगाने स्थिर सर्व्हेक्षण पथकांची संख्या वाढवून
रेल्वे स्टेशन व बस स्थानकांवर बंदोबस्त वाढविण्याच्या सुचनाही संबंधितांना यावेळी
देण्यात आल्या. तसेच भरारी पथक, स्थिर सर्व्हेक्षण पथक, व्हिडीओ सर्व्हेक्षण पथकांच्या
कामकाजाचा आढावा घेतला तर मागील लोकसभा निवडणूकीच्या वेळी मतदार संघातील महिला मतदारांची कमी झालेल्या मतदान
केंद्रावर कॉर्नर सभा घेण्याचे नियोजन गट विकास अधिकारी मालती जाधव तर पोलीस
उपनिरीक्षक पौर्णीमा राखुंडे यांना करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मॉडेल
मतदान केंद्राची माहिती देतांना ग्रामीण
भागात मुंदखेडा बु. तर शहरी भागात य.ना.चव्हाण महाविद्यालयात स्थापन करण्यात
आलेल्या मॉडेल मतदान केंद्राचे सादरीकरण करून माहिती दिली. तर या केंद्राप्रमाणे
इतर मतदान केंद्रावर देखील निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस
कर्मचा-यांना पुरविण्यात येणा-या सोयी सुविधांची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
यांना दिली.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांना आदर्श
आचार संहितेचे पालन करण्याच्या सुचना केल्या तर लोकशाही बळकट करण्यासाठी जनतेने
अधिकाधीक मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment