मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी
यांचा प्रथम प्रशिक्षण वर्ग संपन्न
चाळीसगांव,दिनांक 02:-
विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने जवळपास 1650 अधिकारी कर्मचा-यांना आज निवडणूक
निरीक्षक के.गोपाल कृष्णा भट यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली वैभव मंगल कार्यालयात मतदान प्रक्रीयेसबंधी प्रशिक्षण देण्यात आले
यावेळी गटविकास अधिकारी मालती जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, नायब तहसिलदार
नानासाहेब आगळे, विजय सुर्यवंशी, विशाल सोनवणे आदि उपस्थित होते.
भडगांव
रोड चाळीसगांव येथील वैभव मंगल कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबीरात निवडणूक निर्णय
अधिकारी मनोज घोडे पाटील म्हणाले की, 017 चाळीसगांव मतदार संघात जरी संवेदनशिल
मतदान केंद्र नसले तरी प्रत्येक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी गाफील न
रहाता मतदान केंद्रावर अव्यवस्थीत वर्तन करणारी व्यक्ती, उपद्रवी व्यक्ती, शस्त्र
बाळगणा-या व्यक्ती, मद्यप्राशन केलेल्या व्यक्ती यांच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी
आवश्यक त्या कलमांची माहिती देऊन मतदान प्रक्रीया निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात
पार पाडण्यासाठीच्या आवश्यक त्या सुचना यावेळी उपस्थितांना दिल्या. प्रशिक्षण शिबीराच्या
प्रथम सत्रात पावर पॉईंट प्रेझेंटेशन व्दारे स्क्रीन वर संपुर्ण प्रात्याक्षीके
दाखवून मुद्देनिहाय सर्व प्रक्रीया उपस्थितांना समजावून सांगीतली व या प्रशिक्षण
वर्गासाठी उपस्थितांशी मुक्तपणे संवाद साधुन येणा-या अडचणी समजून योग्य त्या
उपाययोजना सांगितल्या. मास्टर ट्रेनर प्रा.डी.एल.वसईकर यांनी मतदान यंत्राव्दारे
मॉकपॉल कसे घ्यावे याचे प्रत्यक्ष मतदान यंत्राव्दारे प्रात्याक्षिक उपस्थितांना
दाखविले. प्रशिक्षण वर्गाच्या दुपारच्या सत्रात सर्व उपस्थित केंद्राध्यक्ष व
मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र प्रत्यक्ष हाताळून येणा-या अडचणींचे निराकरण
करण्यात आले.
या प्रशिक्षण
वर्गासाठी उपस्थित असलेल्या कर्मचा-यांकडून टपाली मतदानासाठीचा नमूना-12 हा फॉर्म
भरून घेण्यात आला तर अनुपस्थित असलेल्या कर्मचा-यांना लोकप्रतिनीधीत्व कायदा
अधिनियम 1951 च्या कलम 134 अन्वये नोटीसा पाठविण्याच्या सुचनाही निवडणूक निर्णय अधिकारी
मनोज घोडे पाटील यांनी केल्या तर या प्रशिक्षण शिबीरास उपस्थित असलेले निवडणूक निरीक्षक
के.गोपाल कृष्णा भट यांनीही निवडणूक कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment