महिला मतदारांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा !
गट विकास अधिकारी मालती जाधव यांचे आवाहन
चाळीसगांव,दिनांक 11:-
मतदान हा आपला हक्क असून सर्वांनी
मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, विशेषत:
महिला मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा व निवडणूक प्रक्रीयेमध्ये
आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन गटविकास अधिकारी मालती जाधव यांनी केले. तालुक्यातील
बहाळ येथे महिलांची विशेष सभा घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या
सुचनेनुसार महिलांनी निर्भयपणे मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे
जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे माहिती पत्रकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
तालुक्यात बहाळसह, जामदा, शिदवाडी, भवाळी, पिलखोड याठिकाणी महिला सभांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी
पोलीस उपनिरीक्षक पौर्णीमा राखुंडे, मास्टर ट्रेनर राऊतराय, विस्तार अधिकारी
बागुल, माळी व स्थानिक गावातील ग्रामसेवक तलाठी आदी उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment