राष्ट्रीय एकता रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
चाळीसगांव,दिनांक 31:- देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई
पटेलांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान आणि एकात्मतेसाठी केलेले प्रयत्न
याची जाणीव देशवासियांच्या मनात कायम रहावी यासाठी या दिनाचे औचित्य साधत चाळीसगांव
प्रशासनातर्फे एकात्मतेची शपथ व एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील
पोलीस परेड मैदानापासून या रॅलीस सुरुवात करण्यात आली तर घाट रोड चाळीसगांव
मार्गावर २ किलो मीटर अंतरावर या रॅलीचा समारोप करण्यात आला तत्पुर्वी पोलीस परेड
मैदानावर जमलेल्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना उपविभागीय अधिकारी मनोज घोडे
पाटील यांनी एकात्मतेची शपथ दिली. या एकता रॅलीस
तालुक्यातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस
अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गटविकास अधिकारी मालती जाधव,
मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांच्यासह तालुकयातील विविध विभागाचे अधिकारी,
कर्मचारी, पोलीस दल, गृह रक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी, नागरिक
मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी
उद्या दिनांक 01 नोव्हेंबर, 2014 रोजी हंस चित्रपट गृहासमोरील
अनिल नगर, चाळीसगांव येथे आयोजीत
केलेल्या स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी उपस्थित राहून श्रमदान करावे असे आवाहन उप
विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी यावेळी केले.
तहसिल कार्यालयात स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती
तर स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी
तहसिल कार्यालय, चाळीसगांव येथे स्व.सरदार वल्लभभाई
पटेल यांची जयंती तर स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांच्या
प्रतिमेला नायब तहसिलदार अनंत परमार्थी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन साजरी
करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे,
नायब तहसिलदार सुर्यवंशी, संदेश निकुंभ यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
* *
* * * * * *
No comments:
Post a Comment