जालना येथे 30 जून ते 4 जुलै या
कालावधीत सैन्य भरती
जळगाव, दि. 7 :- जालना
येथे सोल्जर जनरल डयूटी, सोल्जर टेकनिशिय, सोल्जर टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट व
नर्सिंग असिस्टंट (व्हेट) , सोल्जर क्लर्क स्टाफ डयुटी आणि सोल्जर स्टेर किपर टेकनिशियन
पदांकरिता दिनांक 30 जून ते 4 जुलै या कालावधीत सैन्य भरतीचे आयोजन केले आहे.
जिल्हयातील जास्तीत जास्त सैन्य इच्छूक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर मिलिंदकुमार बडगे यांनी केले आहे.
दिनांक 30 जून 2014 रोजी सकाळी 3.00 ते 6.00 यावेळेत उपस्थित रहावे. –
सोल्जर जनरल डयुटी, सोल्जर टेक्निशियन, सोल्जर टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट व
नर्सिंग असिस्टंट (व्हेट), सोल्जर क्लर्क स्टॉफ डयुटी आणि सोल्जर स्टोर किपर
टेकनिशियन , उत्तीर्ण झालेल्यांसाठी दिनांक 4 जुलै 2014 रोजी चिकित्सा तपासणी होईल.
वेगवेगळया
ट्रेडसाठी लागणारी शारीरिक क्षमता व शैक्षणिक अटी पुढीलप्रमाणे –
सोल्जर जनरल डयुटी - उंची 168 से.
मी., वजन 50 कि.ग्रॅ. छाती 77-82 से. मी.,
वय 17 ½ ते 21 वर्षे, शैक्षणिक
क्षमता 10 वी पास सायन्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी प्रत्येकी 45 टक्के मार्क्ससह
सोल्जर - उंची 167 से. मी., वजन 50 कि. ग्रॅ., वय 17 ½
ते 23 वर्षे, शैक्षणिक पात्रता (अ) 12 वी पास सायन्स भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
गणित व इंग्रजी प्रत्येकी 45 टक्के मार्क्स सह, (आ) 10 वी पास 50 टक्के मार्क्स,
आणि 3 वर्षाचा इंजि. डिप्लोमा AICTE
इंस्टीटयूट मधून.
सोल्जर क्लर्क स्टाफ डयुटी आणि सोल्जर स्टोर किपर टेकनिशियन - उंची 162 से.
मी. वजन 50 कि. ग्रॅ. वय 17 ½ ते
23 वर्षे , शैक्षणिक पात्रता - (अ) 12 वी पास 50 टक्के मार्क्स सह तसेच 40 टक्के
मार्क्स गणित / अकाऊंटन्सी / पुस्तक रक्षा
विषय 10 /12 वी प्रत्येकी. (आ) किंवा B sc
ग्रॅज्युएट गणित व इंग्रजी प्रत्येकी 40 टक्के मार्क्स 10 / 12 वी पास किंवा
ग्रॅज्युएट गणित, इंग्रजी, अकाऊंट / पुस्तक रक्षा प्रत्येकी 40 टक्के मार्क्स 10 /
12 वी पास.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- एस. एस. सी. / एच. एस. सी. च्या
गुणपत्रक व बोर्डाच्या प्रमाणपत्राच्या मुळप्रती, जर बोर्डाचे मुळ प्रमाणपत्र नसेल
तर बोर्डातील तात्पुरते प्रमाणपत्र ज्यात उमेदवारांच्या जन्म तारखेची नोंद असेल ते
आवश्क आहे. लिव्हींग सर्टीफिकेट किंवा शाळा / कॉलेजचे बोनाफाईड सर्टीफिकेटची
मुळप्रत, सरपंचाचा दाखला आणि चारित्र प्रमाणपत्र जे सहा महिन्यापेक्षा जुने नसावे
फक्त खुल्या प्रवर्गासाठी सरपंचाची सही असलेले जातीचे प्रमाणपत्र, 5X4 से. मी.
आकाराच्या नुकत्याच काढलेल्या रंगीत 14 फोटोंच्या प्रती निगेटीवसह, विना अटेस्टेड
केलेले, संपूर्ण तपशिल असलेल्या जिल्हाधिकारी / उप जिल्हाधिकारी किंवा उप विभागीय
अधिकारी यांचे हस्ताक्षर असलेला रहिवाशी दाखला. वय आणि राष्ट्रीयत्वा बाबतचे
तहसिलदार / कार्यकारी दंडाधिकारी यांचे हस्ताक्षर असलेले प्रमाणपत्र, मुलासाठी
स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट वापरण्यात येण्याबाबतचे संपूर्ण तपशिलसह कमीत कमी मेजर रँक
अधिका-यांच्या कार्यालयीन स्टॅम्प लावून स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र. सर्व
कागदपत्रांच्या छायांकित प्रतिंचा एक संपूर्ण ॲटेस्टेड केलेला सेट.
विशेष सुचना : सेनेत भरती होणेसाठी पैसे लागत नाहीत. जर तुम्ही सर्व
परीने सक्षम असाल तर मेरीट लिस्टमध्ये तूमचे नाव येईल. बेइमान दलाल आणि
धोकेबाजांपासून सावधान त्यांना कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये. जर अशी कोणी
व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा भ्रस्टाचार विरोधी
पथकास द्यावी. आपल्या कोणत्याही प्रकारच्या शंकेचे समाधान आमच्या रिक्रुटींग
स्टाफ कडून केले जाईल जे तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करत राहतील.
|
सैन्य भरती इच्छुक तरुणांनी सैन्य
भरतीबाबत अधिक माहितीकरीता दुरध्वनी क्र. 020-26341698 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर
मिलिंद कुमार बडगे यांनी केले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment