पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट परीक्षा 11
मे रोजी
जळगाव, दिनांक 5 - भारतीय
डाक विभागातर्फे असिस्टिंट , सॉर्टीग असिस्टंट सरळभरती 2013-14 ची लेखी परीक्षा रविवार
दिनांक 11 मे 2014 रोजी दुपारी 2.00 ते 4.00
या वेळेत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सदरील परीक्षेचे प्रवेशपत्र हे www.pasadrexam2014.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन युजर आयडी व पासर्वड वापरुन
प्राप्त करावेत प्रवेश पत्र टपालव्दारे पाठविण्यात येणार नसल्याचे जळगाव डाकघरचे अधिक्षक श्री. आर. डी. तायडे यांनी कळविले आहे.
* * * * * * *
शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था,
बोदवड
येथे मोटार वाहन प्रशिक्षण
जळगाव,
दि. 5 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड येथे मोटार ड्रायव्हींग स्कुल
सुरु करण्याकरिता विभागीय परिवहन अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. प्रशिक्षणाचा
कालावधी 21 दिवसात 10 तास या प्रमाणे राहील. प्रवेश क्षमता एका बॅच करीता 15 ते 20
प्रशिक्षणार्थी इतकी असून प्रती प्रशिक्षणार्थ्यांकरीता रुपये 2800 इतके शुल्क
आहे.
इच्छूक
प्रशिक्षणार्थ्यानी मोटार वाहन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संस्थेचे
निदेशक श्री. एच. ई पाने यांचेशी संपर्क साधावा ( मोबाईल न. 8050937937 / 02582- 275700) असे आवाहन प्राचार्य
श्री. आर एम. राठोड यांनी केले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment