Thursday, 1 May 2014

चाळीसगावात 54 वा महाराष्ट्र वर्धापन दिन उत्साहात साजरा


चाळीसगावात 54 वा महाराष्ट्र वर्धापन दिन उत्साहात साजरा
                      
            चाळीसगाव, दिनांक 1 मे :- महाराष्ट्र राज्य‍ स्थापनेचा 54 वा वर्धापन दिन  आज उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते सकाळी 08:00 वाजता ध्वजारोहणाने उत्साहात संपन्न झाला.
            पोलीस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमास आमदार राजीव देशमुख, माजी आमदार ईश्वर जाधव, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गट विकास अधिकारी मालती जाधव, तालुका कृषि अधिकारी व्हि.एस.शिंदे, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार एम.बी.सुर्यवंशी, ए.एन.परमार्थी आदि उपस्थित होते.
            ध्वजारोहणानंतर पोलीस प्रशासनातर्फे ध्वजास मानवंदना देऊन शानदार संचलन पार पडले. त्यामध्ये पोलीस दल व होमगार्डचा समावेश होता .
            या कार्यक्रमास शिक्षण महर्षी उदेसींग आण्णा पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आमदार राजीव देशमुख यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरीकांना शुभेच्छा देऊन वार्तालाप केला.
प्रांत व तहसिल कार्यालयातही झाला ध्वजारोहण

            महाराष्ट्र दिनानिमीत्त उप विभागीय कार्यालय, चाळीसगांव येथे सकाळी 07:00 वाजता  उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते तर सकाळी 07:15 वाजता तहसिल कार्यालयात तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

                                                   * * * * * * * *

No comments:

Post a Comment