इ. 10 वी परीक्षा साहित्य वाटप
जळगाव, दि. 14 :- महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) मार्च
2014 परीक्षेस प्रविष्ठ होणा-या
विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र, प्रात्याक्षिक, तोंडी, श्रेणी तसेच तंत्र व पूर्व
व्यवसायिक विषयांच्या परीक्षेचे साहित्य नेहमीच्या वाटप केंद्रावर जळगाव, भुसावळ,
चाळीसगाव व अमळनेर येथे दिनांक 18 फेब्रुवारी
2014 रोजी सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. संबंधित
शाळांच्या प्रमुखांनी नोंद घेवून आपला जबाबदार प्रतिनिधी अधिकार पत्रासह दिनांक 18
रोजी वाटप केंद्रावर पाठवावा.
तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 12
वी ) फेब्रुवारी 2014 च्या परीक्षेतील वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही याची
सर्व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय
सचिव माराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ ,
नाशिक यांनी केले आहे.
* * * * * * * *
रुफ
लाईट बसविणे प्रस्तावित रिक्षा टॅक्सी संघटनांकडून हरकती मागविल्या
जळगाव, दि. 14 :- हकीम समितीच्या
शिफारशीनुसार शासनाने राज्यातील सर्व टॅक्सी व रिक्षाच्या टपावर दर्शक दिवा अर्थात
रुफलाईट बसविणे बंधनकारक केले आहे. रुफलाईट बसविल्याने कोणतीही टॅक्सी किंवा
ऑटोरिक्षा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे किंवा नाही हे 100 ते 150 मीटर अंतरावरुन
लक्षात येईल, त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांकडून प्रवाशी नाकारण्याच्या
प्रकरणांमध्ये घट होईल.
सदर रुफलाईटची तरतुद महाराष्ट्र
मोटार वाहन नियमांत करणे प्रस्तावित आहे. ही तरतूद अंमलात आणल्यानतर राज्यात सर्व
टॅक्सी रिक्षाच्या टपावर रुफलाईट बसविणे बंधनकारक राहील.
परवानधारक रिक्षा, टॅक्सी
संघटनाचे याबाबत काही हरकती असल्यास लेखी स्वरुपात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,
जळगाव यांचेकडे दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत
सादर कराव्यात असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * * * *
आय टी आय मध्ये ड्रायव्हिंग प्रशिक्षण
जळगाव, दि. 14 :- शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था जळगाव येथे दि. 15 पासून मोटार ड्रायव्हींग प्रशिक्षण केंद्र
सुरु करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी अनुभवी शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
प्रशिक्षण दरम्यान गाडीच्या विविध उपांगे / इंजिन बाबत माहिती देण्यात येणार आहे.
महिलांसाठी स्वतत्र बॅच राहील.
प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे
- अभ्यासक्रमाचा कालावधी 21 दिवसात (10 तास), प्रवेश क्षमता - एका बॅचमध्ये 15 ते
20 प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षण शुल्क प्रति प्रशिक्षणर्थी रु. 2800/-, प्रशिक्षणाची
वेळ प्रशिक्षणर्थ्यांच्या सोयीनुसार राहील. सदर प्रशिक्षण पूर्ण करणा-या
प्रशिक्षणार्थ्यास संस्थेकडून प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात
येईल. प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 025-2234520 वर संपर्क साधावा
असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment