आहरण संवितरण अधिका-यांची कार्यशाळा
जळगाव,
दि. 13 :- जळगाव कोषागाराच्या व उपकोषागार
कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी, राज्य शासकीय
कर्मचारी तसेच पुरवठादार व कंत्राटदार यांच्याकडून आयकर ( T D S) वसुली संदर्भात
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय,
जळगाव येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हयातील सर्व आहरण व सवितरण
अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे
यानी केले आहे.
* *
* * * * * * *
हरभरा पिकावरील
किड रोग नियंत्रणासाठी
कृषी
विभागाचा मार्गदर्शनपर सल्ला
जळगाव,
दि. 13 :- जळगाव, भुसावळ, यावल, रावेर , मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील हरभरा
पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची
नेमणूक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत
हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग
नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे
सल्ला दिला आहे.
हरभरा : मर - मर रोगाचा प्रादुर्भाव
आढळून आलेला असून नियमित निरीक्षणे घेवून रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करुन पुढील
प्रादुर्भाव पसरणार नाही.
* *
* * * * * * *
माजी सैनिक तालुका समिती बैठक
जळगाव, दि. 13 - माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या
अडी अडचणी सोडविण्याकरिता गठीत केलेल्या समितीची बैठक एरंडोल येथे दिनांक 25
फेब्रुवारी तर रावेर येथे 26 रोजी 11.30 वाजता तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित केली आहे. तरी संबंधीत तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी त्यांच्या अडी
अडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्यात व बैठकीस हजर राहून आपले प्रकरण
तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
कमांडर (नि.) मिलींदकुमार एम. बडगे, यांनी केले आहे.
* *
* * * * * * *
माजी सैनिकांना रोजगाराची संधी
जळगाव, दि. 13 :- रेल्वेमध्ये विविध संवर्गातील
लोको पायलट व टेक्नीशियन ही पदे माजी सैनिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे.
याबाबतची जाहिरात दिनांक 18 ते 25 जानेवारी 2014 च्या एम्प्लायमेंट न्यूज नं
01/2014 प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी जळगाव जिल्हयातील जास्तीत जास्त
पात्रताधारक माजी सैनिकांनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
मिलींदकुमार बडगे यांनी केले आहे.
* *
* * * * * * *
No comments:
Post a Comment