जळगांव,
दि. 25 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत मोटार सायकल नवीन नोंदणी एमएच -19/बीएस-0001
ते 9999 पर्यतची मालिका लवकरच सुरु करण्यांत येणार आहे.
ज्या
वाहन धारकांना आपल्या वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल
त्यांनी दाखल करावेत, व विहीत शुल्काच्या
रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक
व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. तसेच अशा आकर्षक
क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहन 30 (तीस) दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर
करणे बंधनकारक राहील. 30 दिवसाचे आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क
हस्तांतरीत किंवा परतावा होणार नाही. त्या रकमेचा परत वापरही होउ शकणार नाही,
मालिका सुरु
झाल्यावर अर्ज स्विकारले जातील. दररोज प्राप्त होणारे अर्ज दुपारी 4-00 वाजेपर्यत
स्विकारले जातील व त्याच दिवशी अर्जाची छाननी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक
अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील.
दुस-या दिवशी
सर्व अर्जदारांनी क्रमांकाचे मुळ शुल्क व वाढीव शुल्क असे दोन धनादेश बंद
लिफाप्यातून सादर करणे बंधनकाकर राहील. दुस-या दिवशी दुपारी 4-00 वा बंद लिफाफे
उघडण्यात येतील व जास्त रक्कमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदास सदर क्रमांक
देण्यात येईल व उर्वरीत धनादेश परत करण्यात येतील. अर्ज प्राप्त झालेल्या
अर्जदारांना अर्ज केलेल्या दिनांकाच्या दुस-या दिवशी पैसे भरुन क्रमांक देण्यात
येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगांव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment