विज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी
महावितरण तर्फे रॅलीचे आयोजन
चाळीसगांव
दिनांक 25 :- मानवी गरजांमध्ये आज विजेला अनन्य महत्व प्राप्त झाले असुन विजेची बचत ही काळाची गरज आहे. विज वाचवा राष्ट्र वाचवा, विज ही विकासाची जननी आहे, विज चोरी थांबवा भारनियमन टाळा अशा घोषणा देत महावितरण तर्फे आज तहसिल कार्यालयापासुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन तहसिलदार बी.एन.गाढवे यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. या रॅलीचा तहसिल कार्यालय, स्टेशन रोड मार्गे सिग्नल पॉईंट, बस स्टॅण्ड, कॅप्टन कॉर्नर मार्गे महावितरणच्या लक्ष्मी नगर येथील विभागीय कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.
या
समारोपाच्या कार्यक्रमात तहसिलदार गाढवे म्हणाले की, महसुल वाढीसाठी ग्राहकांबरोबर महावितरण तर्फे देखील सुसंवाद साधणे गरजेचे असुन विज चोरीमुळे होणा-या अपघातांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन करण्याची चांगली प्रथा या माध्यमातुन सुरु झाली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य समजुन ग्राहक व महावितरण मध्ये कौटुंबिक वातावरण निर्मीती या माध्यमातुन नक्कीच होईल असे सांगुन ग्राहकांनी देखील या उपक्रमाचा लाभ घ्यावा व महावितरणास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
या
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातुन जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक प्रदिपदादा देशमुख म्हणाले की, प्रशासन-शासन व कायदा या पलीकडे जाऊन लोकसहभागातुन विज चोरी थांबविण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असुन विज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरणाच्या या रॅली आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. विज निर्मीती व विज वितरणामधील तफावत वाढल्यामुळेच आपल्याला भारनियमनाला सामोरे जावे लागते, करिता विजेची बचत व सुयोग्य वापर किती महत्वाचा असुन विज निर्मीती ही नैसर्गीक संपत्तीवर आधारीत आहे त्या विजेचे महत्व प्रत्येकाने ओळखले पाहिजे व विजेचा काटकसरीने वापर केला पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणातुन सांगितले.
महावितरणचे
कार्यकारी अभियंता धनंजय मोहोड म्हणाले की, ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द् असुन विज चोरी, विज गळती, अपघात व भारनियमन या विषयक विज ग्राहकांमध्ये जनजागृती होण्याचा प्रमुख उद्देश या रॅलीच्या आयोजनाचा असुन विभागातील संपुर्ण सदोष विज मिटर बदलविण्याचा उपक्रम महावितरण तर्फे राबविण्यात येणार आहे. करिता ग्राहकांनी देखील या उपक्रमात सहभागी होऊन आपले सदोष मिटर बदलविण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले व महावितरण तर्फे ग्राहकांना देण्यात येणा-या विविध सेवा विषयक माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी
पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंबाट, उप निरीक्षक वाघ तर महावितरणचे विविध पदाधिकारी आदिंनी मार्गदर्शनपर भाषणे केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक अभियंता धिरज चव्हाण तर आभार प्रदर्शन ईश्वर पाटील यांनी केले. सदर रॅली यशस्वी करण्याकरिता कनिष्ट अभियंता गणेश अस्मार, राहुल कुलकर्णी, उन्नत जगताप, प्रताप सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी
नगराध्यक्षा अनिता चौधरी, उपनराध्यक्ष प्रदीप निकम, सहायक पोलीस निरीक्षक देवरे, ग्राहक प्रतिनीधी श्रीकृष्ण पाईप इंडस्ट्रीजचे संचालक प्रदीप अमृतकर यांच्यासह महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * *
No comments:
Post a Comment