जळगांव, दि. 27:- समाजातील
तळागाळातील मागासवर्गीयांचा विकास व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी प्रथमत: योजनांची
माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहोचावी असे आवाहन पालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री
संजय सावकरे यांनी आज भुसावळ येथे जिल्हा परिषद स्तर समाजकल्याण अतर्गत 20 टक्के
निधी व महिला बाल कल्याण 10 टक्के निधी सन 2012-13 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या
योजने अंतर्गत मंजूर लाभार्थ्याना साहित्य वाटप
कार्यक्रमाच्या केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती
भुसावळच्या सभापती श्रीमती मंदाकीनी झोपे
उपस्थित होत्या.
भुसावळ येथे योजना निहाय मंजूर
लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे
20 टक्के समाजकल्याण अंतर्गत शेवाई मशीन 2, मंडप साहित्य 4, भजनी मंडळ
सात्यि 2, एच. डी. पी. ई. पाईप 8, पन्हाळी पत्रे 5, ताडपत्री 19
10
टक्के महिला बालकल्याण - मिनी पिठाची चक्की 10
यावेळी बोलतांना पालकमंत्री सावकारे पुढे म्हणाले की, मागासवर्गीय व दलित लोकांना
आधी शिक्षण देऊन त्यांना सहकार्य केल्यास त्यांच्या विकासाच्या विविध् विकास
योजनांची माहिती मिळेल त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. समाज
शिक्षित झाल्यावरच त्यांची प्रगती होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन गट
विकास अधिकारी आर . पी. तायडे यांनी केले.
No comments:
Post a Comment