Monday, 22 July 2013

सैन्य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण



          जळगांव, दि. 22 - जळगांव जिल्हयातील सैन्य व पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-या युवकांसाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे व कमीत-कमी खर्चात प्रशिक्षण देऊन भरती योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगिकृत असलेल्या माजी सैनिक महामंडळाव्दारे करंजे नाका, सातारा येथे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. येथे 30 दिवसांचे 98 वे प्रशिक्षण शिबीर दिनांक 30 जुलै 2013 ते 28 ऑगस्ट 2013 या कालावध्णीत चालविले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी निवास व भोजनासह एकूण शुल्क रु. 6000/- आकारले जाते. तरी इच्छूक उमेदवारांनी ( 10 वी ते 12 वी पास असल्याचे गुणपत्रक (मार्कशिट) लिव्हींग सर्टिफिकेट) शैक्षणिक प्रमाणपत्रांसह निवड चाचणीसाठी 26 जुले 2013 तारखेला सकाळी 9.00 वाजता सैनिकी मुलांचे वसतीगृह, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगांव येथे हजर रहावे. चाचणी नंतर पात्र ठरलेल्या युवकांना सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश शुल्क रक्कम रुपये 200/- त्वरीत भरुन उमेदवाराने आपला प्रवेश निश्चित करावा. या प्रशिक्षण केंद्रामध्ये पात्र विद्यार्थ्याकडून सैन्यात भरती होण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करुन घेतली जाते. यात शारिरीक चाचणीमध्ये रनिंग,मैदानी खेळ, पुलप्स, लॉग जम्प, गोळाफेक इत्यादी तसेच इतर विषयांमध्ये लेखी परीक्षेसाठी जनरल नॉलेज, इंग्रजी, गणित या विषयांची तयारी करुन घेतली जाते. तरी जळगांव जिल्हयातील युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment