जळगांव, दि. 20 :- संशोधन अधिकारी,
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे यांचे कार्यालयाचे वतीने कळविण्यात
येते की, दिनांक 18 मे 2013 च्या शासन निर्णयानुसार सर्व मागासवर्गीय अधिकारी
कर्मचारी यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. तसेच
मागासवर्गीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचे जाती दाव्याबाबतचे जात प्रमाणपत्र
पडताळणीचे प्रस्ताव संबधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दिनांक 31 जुलै 2013
पर्यत जमा करुन सदरची पोच पावती संबंधित कार्यालयाच्या आस्थापनेच्या विभाग
प्रमुखाकडे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची गैरसोय टाळण्यासाठी समितीच्या
अधिनस्त असलेल्या सेतू सुविधा केंद्रामार्फत अधिकारी / कर्मचारी यांचे जात
प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सकाळी 8.30 ते सायं. 7 पर्यत तसेच सार्वजनिक सुटी (शनिवार व रविवार)
या दिवशी सुध्दा स्विकारले जातील याची सर्व मागासवर्गीय अधिकारी / कर्मचारी यांनी
नोंद घ्यावी असे आवाहन श्री. राकेश जी. पाटील संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक क्र. 2 मुख्यालय, धुळे यांनी कळविलेले
आहे.
No comments:
Post a Comment