Friday, 19 July 2013

6149 शेतक-यांना पीक विम्यापोटी 6.74 कोटी मंजूर



          जळगांव, दि. 19 – जळगांव सन 2012-2013 मध्ये शासनाने खरीप हंगामासाठी कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मुग, सोयाबीन, तुर, कांदा या पिकांसाठी राष्ट्रीय कृषि पीक विमा योजना राबविली होती त्यानुसार खरीप 2012 मध्ये पीक विमा उतरवलेल्या 6149 शेतक-यांना राष्ट्रीय कृषि पिक विमा योजनेतून 6.74 कोटी नुकसान भरपाई जळगांव जिल्हयासाठी निश्चित झालेली असून जाहीर झालेली आहे.
              नुकसानग्रस्त कापूस उत्पादक सर्वाधिक 6149 उत्पादकांना 6.74 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. या शिवाय बाजरी व ज्वारी आदी पिकांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे. सर्वाधिक कापूस पिकासाठी जामनेर तालुक्यातील 1598 उत्पादकांना 2 कोटी 23 लाख 85 हजार, जळगांव तालुक्यातील 1443 उत्पादकांना 1 कोटी 26 लाख, चाळीसगांव तालुकयातील 1054 उतपादकांना 1 कोटी 12 लाख 22 हजार, एरंडोल तालुक्यातील 678 उत्पादकांना 56 लाख 65 हजार, धरणगांव तालुक्यातील 578 उत्पादकांना 94 लाख 40 हजार, पारोळा तालुक्यातील 273 उत्पादकांना 12 लाख 73 हजार, पाचोरा तालुका 128 उत्पादकांना 31 लाख 87 हजार, बोदवड तालुक्यातील 385 उत्पादकांना 23 लाख 80 हजार नुकसान भरपाई मिळणार आहे.
          या वर्षी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 आहे. तरी शेतक-यांनी नजीकेच बॅकेत किंवा आपले खाते आहे त्याठिकाणी वीमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगांव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment