Friday, 29 November 2024
जागतिक एड्स दिन निमित्ताने जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालयतर्फे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज भरण्यासाठीची मुदत 1 डिसेंबरपर्यंतच कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा पोष्टाने अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळितधान्य पिकस्पर्धा रब्बी हंगाम -2024 साठी ३१ डिसेंबर पर्यंत करता येणार अर्ज
Thursday, 28 November 2024
निवडणुकीतून मुक्त होताच जिल्हा प्रशासन लागले कामाला ; विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा
जळगाव, दिनांक 28 नोव्हेंबर (जिमाका वृत्त) : जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व विकासकामांचा आढावा आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतला. त्यात “दिशा” (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ) समितीच्या विषयाशी निगडित बाबी अंतर्भूत होत्या.
याप्रसंगी
सर्व विकास कामांचा संबधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण
करण्याच्या सुचना संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी ज्या यंत्रणाकडे कामे
प्रलंबित आहेत, त्यांना फोनवर घेवून समोरासमोर अडचणी सोडवून दिल्या.
रेल्वेचे
विविध ठिकाणचे प्रलंबित पूल, त्याला निगडित सार्वजनिक बांधकाम, भूसंपादन, क्रिडा, परिवहन,
नगर विकास, वन, मुद्रांक शुल्क, नगर रचना, GSDA,
ग्रामीण विकास, जलसंपादन, शिक्षण विभाग, क्रिडा, जिल्हा उद्योक केंद्र, सहकार,
कौशल्य विकास, नगरविकास, तहसिलदार संबधित प्रकरणे, पुर्नवसन, MIDC इत्यादी सर्व विभागातील
प्रलंबित विकास कामांची व योजनांचा पाठपुरावा करण्यात आला.
राष्ट्रीय
महामार्गाचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून हे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी
आपण स्वतः जिथे अडथळा असेल तिथे हजर असल्याचे सांगून कामं सुरु आहेत पण त्याचा वेग
अजून वाढविण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिला.
या
सोबतच जलसंपदा आणि इतर विभागातील सर्व प्रलंबित कामे योग्य समन्वय साधत त्वरित पुर्ण
कराव्यात] अशा सुचना या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी
ग्रामीण विकास प्रकल्प समन्वयक राजू लोखंडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी जयश्री
माळी, पुनर्वसन विभागाचे दुसरे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी
व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Wednesday, 27 November 2024
"विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको" - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -
पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव, दिनांक 27 नोव्हेंबर ( जिमाका वृत्त ) : पाच वर्षातून एकदा होणारी पशु गणना ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. या पशु गणनेच्या माध्यमातून विविध भागात असलेले पशुधन त्यांची परिस्थिती करावयाच्या उपायोजना या सर्व बाबींचे आकलन होत असल्याने पशु गणना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हा
परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पशु गणना प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्ष
स्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित,
पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. बी. आर नरवाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप झोळ,
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मास्टर ट्रेनर डॉ.
अमित कुमार दुबे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाहेद तडवी आदी यावेळी
उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पशु गणनेच्या
माध्यमातून पासून विषयी अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती मिळते.
पशु
प्राणी यांची काळजी कशी घ्यावी याची देखील माहिती या निमित्ताने पुढे येते. पशुगणना
हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने पशु गणना ही सूक्ष्म नियोजन पद्धतीने करावी. पशु
गणना करताना गाव खेड्यावरील एकही पशु सुटणार नाही याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे.
गाव खेड्यावरील प्रत्येक गोठ्या पर्यंत जाऊन पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशु
गणना करणे आवश्यक असल्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या पशुगणनेच्या
माध्यमातून जिल्हाभरातील पशुंविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. पशुगणनेच्या
माध्यमातून विविध जाती प्रजातींच्या पशूंची गणना होणार असून त्यानिमित्ताने जिल्ह्यात
असलेल्या पशुधनाची आकडेवारी पुढे येणार आहे. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा
दुग्ध व्यवसाय तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने देखील पशुधनांना अत्यंत महत्त्वाची आहे.
21 वी पशुगणना ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार असल्यामुळे गणना करताना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देखील
त्यांनी यावेळी दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमात बुलढाणा येथून खास उपस्थित असलेले
मास्टर ट्रेनर डॉ.अमितकुमार दुबे यांनी पशु गणना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन
जळगाव, दिनांक 27 ( जिमाका ) : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी दिली. युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात येते. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२०२४-२५ या वर्षात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन हे विज्ञान व तत्रज्ञान या नवसंकल्पनावर आयोजित करावयाचे आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयामार्फत करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत प्रदर्शने, सांस्कृतिक स्पर्धा, लोकगीत, लोकनृत्य, कौशल्य विकास स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, वत्क्तृत्व स्पर्धा, कविता, हस्तकला, वस्त्रोद्योग व अॅग्रो प्रॉडक्ट व मोबाईल फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. याच युवा महोत्सवाचा एक भाग म्हणजे जळगाव युथ आयकॉन- ज्या युवक/ युवतींनी सामाजीक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, तसेच नैसर्गिक आपत्ती, इतर आपत्कालीन परिस्थीतीत उल्लेखनिय कार्य केले असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
या युवा महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकणार आहे . स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासनाद्वारे विविध पारितोषिके तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यातयेणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक व युवती यांची विभागस्तरावर निवड करण्यात येणार व विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त युवक युवती यांची निवड राज्यस्तरीय युवा महोत्सवाकरीता करण्यात येणार आहे. पुढे राष्ट्रीय युवा महोत्सवाकरीता प्राविण्य प्राप्त युवक व युवती यांची निवड केली जाईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले.
युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळे, सांस्कृतिक मंडळ, जिल्ह्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथील १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.
जळगाव जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळ, वैयक्तिक युवक-युवती यांनी आपले प्रवेश अर्ज २८ नोव्हेंबरपर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी ९८२३७७३७९७ आणि ८६२५९४६७०९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा छ त्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यलयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.
संविधान दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र जळगावच्या वतीने पद यात्रेचे आयोजन
जळगाव, दिनांक 27 नोव्हेंबर ( जिमाका ) : नेहरू युवा केंद्र जळगावच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ व राष्ट्रीय सेवा योजना भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने MYBharat मार्फत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात २ डिसेंबर रोजी दिव्यांग नागरिकांसाठी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयावर कार्यशाळा संपन्न!
जळगाव, दिनांक २७ नोव्हेंबर ( जिमाका ) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव व आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयावर जळगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय, मेहरूण आणि राज प्राथमिक विद्या मंदीर मेहरूणयेथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Tuesday, 26 November 2024
महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून 1000 कोटींचा निधी मंजूर
नवी दिल्ली, दिनांक 26 नोव्हेंबर : आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत, महाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमताबांधणीसाठी एकूण 1115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्राला या प्रकल्पांतर्गत 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने 15 राज्यांमध्ये भूस्खलन जोखीम शमन प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला .या निधीतून महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय उत्तराखंडसाठी 139 कोटी रुपये, हिमाचल प्रदेशसाठी 139 कोटी रुपये, ईशान्येकडील आठ राज्यांसाठी 378 कोटी रुपये, कर्नाटकासाठी 72 कोटी रुपये, केरळसाठी 72 कोटी रुपये, तामिळनाडूसाठी 50 कोटी रुपये आणि पश्चिम बंगालसाठी 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यासोबतच, सर्व राज्यांतील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी 115.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी समितीने हिमनदी उद्रेक पूर जोखीम व्यवस्थापनासाठी 150 कोटी रुपये आणि सात शहरांमध्ये नागरी पूर व्यवस्थापनासाठी 3075.65 कोटी रुपये मंजूर केले होते.
आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षातंर्गत 21,476 कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यांतील तरतुदींचा समावेश आहे.
दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई, दिनांक २६ : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलीस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्म्य पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
१६ व्या हुतात्मा स्मृतीदिनी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस दलामार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली. पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ तसेच 'बिगुलर्स लास्ट पोस्ट' वाजविले. यावेळी पोलीस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले.राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : संविधान दिवसानिमित्त शासकिय कार्यलयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येते. संविधान दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन घेण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, श्री.भीमराज दराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, श्री.अरविंद अंतुरलीकर, श्री.सुरेश कोळी, तहसीलदार, सामान्य प्रशासन, जि का, श्रीमती ज्योती वसावे, तहसीलदार, करमणूककर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात २ डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाहीदिन सोमवार, दिनांक २ डिसेंबर, 202४ रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी दिली आहे. या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी २५ ऑक्टोबर ते १०डिसेंबर या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) सन २०२४-२५ मध्ये अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणेसाठी दिनांक २५ ऑक्टोबर ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्या करीता मोहीम राबविण्यात येत आहे.
संविधान दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) : 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात 'संविधान दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेत राज्यघटनेला मान्यता देण्यात आली होती. संविधान दिवसानिमित्त शासकिय कार्यलयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येते. संविधान दिनानिमित्त जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन घेतले. याप्रसंगी श्री.प्रमोद भंगाळे, श्री.चेतन आहिरे. श्री.पंकज ठाकुर, उषा लोखंडे , श्री. भुषण सोनवणे, श्री.भुषण पाठक, वैशाली पाटील उपस्थित होते.
0 0 0 0 0 0 0
जळगाव जिल्ह्यात आजपासून २१ व्या पशुगणनेला प्रारंभ; पाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची होणार गणना
प्रत्येक मताचे मूल्य जाणणारी यंत्रणा, रात्रीचा दिवस करते तेव्हा....!!
जळगाव, दिनांक 25 ( जिमाका ) : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाली. निवडणुक काळात अनेक शासकिय कर्मचारी हे दिवस रात्र, वेळेची पर्वा न करता मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडावी याकरिता कार्यरत होते. मतमोजणीच्या एक दिवसाआधी 22 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता, जळगाव जिल्हा पोस्टल मतपत्रिका केंद्राला भंडारा जिल्ह्यातून 127-इगतपुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाली. 127-इगतपुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका जळगावमधील 12-भुसावळ विधानसभा मतदारसंघातील मतपत्रिकांमध्ये चुकून आढळून आली होती.