जळगाव, दिनांक 28 नोव्हेंबर (जिमाका वृत्त) : जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व विकासकामांचा आढावा आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतला. त्यात “दिशा” (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ) समितीच्या विषयाशी निगडित बाबी अंतर्भूत होत्या.
याप्रसंगी
सर्व विकास कामांचा संबधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण
करण्याच्या सुचना संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी ज्या यंत्रणाकडे कामे
प्रलंबित आहेत, त्यांना फोनवर घेवून समोरासमोर अडचणी सोडवून दिल्या.
रेल्वेचे
विविध ठिकाणचे प्रलंबित पूल, त्याला निगडित सार्वजनिक बांधकाम, भूसंपादन, क्रिडा, परिवहन,
नगर विकास, वन, मुद्रांक शुल्क, नगर रचना, GSDA,
ग्रामीण विकास, जलसंपादन, शिक्षण विभाग, क्रिडा, जिल्हा उद्योक केंद्र, सहकार,
कौशल्य विकास, नगरविकास, तहसिलदार संबधित प्रकरणे, पुर्नवसन, MIDC इत्यादी सर्व विभागातील
प्रलंबित विकास कामांची व योजनांचा पाठपुरावा करण्यात आला.
राष्ट्रीय
महामार्गाचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून हे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी
आपण स्वतः जिथे अडथळा असेल तिथे हजर असल्याचे सांगून कामं सुरु आहेत पण त्याचा वेग
अजून वाढविण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिला.
या
सोबतच जलसंपदा आणि इतर विभागातील सर्व प्रलंबित कामे योग्य समन्वय साधत त्वरित पुर्ण
कराव्यात] अशा सुचना या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी
ग्रामीण विकास प्रकल्प समन्वयक राजू लोखंडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी जयश्री
माळी, पुनर्वसन विभागाचे दुसरे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी
व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment