Sunday, 2 October 2016

चाळीसगाव पंचायत समिती आरक्षण सोडत 5 ऑक्टोंबर रोजी

चाळीसगाव पंचायत समिती आरक्षण सोडत 5 ऑक्टोंबर रोजी
             
चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या 18 ऑगस्ट आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्तांकडील 28 सप्टेंबर 2016 च्या आदेशान्वये जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणामधील नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील/सर्वसाधारण प्रवर्गातील) आरक्षणाची सोडत संबंधित तालुक्यांच्या मुख्यालयी   काढण्यात येणार आहे.
       चाळीसगाव पंचायत समितीचे आरक्षण सोडत नगरपालीका सभागृह, चाळीसगाव येथे बुधवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित केलेली आहे. आरक्षण सोडत चाळीसगाव महसूल उप विभागाचे उप विभागीय अधिकारी शरद भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीस प्रारंभ
             
चाळीसगाव दि. 2 (उमाका वृत्तसेवा) :  भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पदवीधर मतदार संघाची मतदार यादी अद्यावत करण्याचे निर्देश असल्याने तालुक्यात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आता 1 नोव्हेंबर,2016 या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. सन 2010 च्या मतदार यादीत तसेच गेल्या वर्षी ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2015 मध्ये विशेष मोहिमेत नाव नोंदणी केलेल्या मतदारांना आता नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीच्या कार्यक्रमात प्रथम शनिवार दिनांक 1 ऑक्टोंबर, 2016 विभागीय आयुक्त यांचे कडून सूचना प्रसिध्द करण्यात आली असून शनिवार दिनांक 15 ऑक्टोंबर, 2016  रोजी जाहीर सुचनेची पहिली पुर्नप्रसिध्दी, मंगळवार दिनांक 25 ऑक्टोंबर2016 जाहीर सुचनेची दुसरी पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार आहे. तर शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज क्रमांक 18 स्वीकारण्याची अंतीम मुदत देण्यात आली आहे.  शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2016 मतदार संघाची प्रत तयार करुन प्रारूप मतदार यादी छपाई करण्यात येईल. बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येईल.  23 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2016 या कालावधीत दावे व हरकती दाखल करणे, सोमवार दिनांक 26 डिसेंबर,2016 दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येईल.  तर शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर,2016 रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येईल.
मतदार नोंदणीसाठीचे फॉर्म सर्व संबंधित कार्यालयांकडे उपलब्ध असून www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन Downoad  Forms  या लिंकवरही उपलब्ध आहेत. मतदार नोंदणी अर्ज उप विभागीय कार्यालये, तहसिल कार्यालय तसेच मंडळ अधिकारी कार्यालयात स्विकृत करण्यात येणार असून या मतदार नोंदणी कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन प्रातांधिकारी शरद पवार व तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment