नागरी भागातील दुरचित्रवाणी
केबलधारकांना
सेट-टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य
: प्रातांधिकारी
मनोज घोडे पाटील
चाळीसगांव, दिनांक 05:- केंद्र शासनाच्या 11 सप्टेंबर, 2015 च्या राजपत्रानुसार
राज्यातील दुरचित्रवाणी केबल प्रसारणाच्या फेज-1 व फेज-2 मध्ये डिजीटायजेशन करण्यात
आलेल्या क्षेत्राव्यतिरीक्त राज्यातील उर्वरित नागरी भागात फेज-3 मध्ये 31 डिसेंबर,
2015 पर्यंत डिजीटायजेशनची प्रक्रिया पुर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानुसार
नागरी भागातील सर्व दुरचित्रवाणी केबल
धारकांनी त्यांच्या दुरचित्रवाणी संचास सेट-टॉप बॉक्स यंत्र 31 डिसेंबर, 2015 पर्यंत
अधिकृत केबल सेवा पुरवठादाराकडून बसवून घेणे अनिवार्य आहे. जे अधिकृत केबल सेवा पुरवठादार दिलेल्या मुदतीत सेट-टॉप
बॉक्स बसविणार नाही अशा केबल सेवा पुरवठा दारांची सेवा खंडीत होऊन यामुळे केबल
धारकांना या सेवेपासून वंचित रहावे लागेल तरी याची विहीत मुदतीत संबंधितांनी अंमलबजावणी
करण्याचे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
दुरचित्रवाणी केबल सेवेच्या डिजीटायजेशन अंतर्गत
विविध वाहिन्यांवरील प्रक्षेपण केबल दुरचित्रवाणी संचास पुर्ण क्षमतेने प्राप्त
होईल. मोठया संख्येने उपलब्ध असलेल्या वाहिन्यांपैकी ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार
व आर्थिक क्षमतेनुसार तथा गरजेनुसार वाहिन्यांची निवड करण्याचा पर्याय देखील
उपलब्ध होईल. प्रक्षेपणातील बहुतांशी दोष दुर होवून दुरदर्शन संचावरील चित्र व चलत
चित्रे यांच्या गुणवत्तेत वाढ होवून ते अधिक सुस्पष्ट स्वरुपात दिसतील त्याचप्रमाणे
आवाजाच्या गुणवत्तेत सुध्दा सुधारण होईल. उपलब्ध वाहिन्यांची संख्या पायाभूत सेवा
पातळीवर कमीत कमी 100 चॅनल्स समाविष्ट आहेत, असे असले तरी ही पध्दत वर्गणीदारावर
बंधनकारक नाही. वर्गणीदार जास्तीत जास्त आवडीचे फ्री टू एअर चॅनल्स घेऊ शकतो.
वर्गणीदार पे चॅनल्स बरोबर एफ.टी.ए. किंवा त्याशिवाय चॅनल्सची निवडही करु शकतो, त्यासाठी
दरमहा रु. 150/- पेक्षा जास्त भाडे त्यास आकारले जाणार नाही. या शिवाय इलेक्ट्रॉनिक
प्रोग्रॅम गाईड, मुव्ही ॲण्ड व्हिडीओ ऑन डिमांड, पर्सनल व्हिडिओ रेकॉर्डरची मागणी
करता येईल. केबल संबंधीच्या तक्रारीचे
निवारण टोल फ्री नंबर व वेबसाईटमुळे कालमर्यादेत शक्य व बंधनकारक झाले आहे. आणि
महत्वाचे म्हणजे केबल धारकांना स्वतंत्र ओळखपत्र मिळणार असल्याने त्याचा इतर
योजनांसाठीही फायदा होईल. तरी वरील सर्व बाबी लक्षात घेता तालुक्यातील नागरी भागातील
सर्व दुरचित्रवाणी केबल धारकांनी आप-आपल्या भागातील अधिकृत एम.एस.ओ/एल.सी.ओ. यांचे
कडून अधिकृत किंमत देऊन व रितसर पावती घेऊनच सेट-टॉप बॉक्सची खरेदी करुन बसवून घेण्याचे
आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह
प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment