अवैध गौणखनिज वाहतुक करणा-यांवर कडक कारवाई करणार !
:प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील
चाळीसगांव,दिनांक 19:-
चाळीसगांव तालुक्यातून सन 2013-14 मध्ये वाळू ठेक्यांचा लिलाव झाला नसल्याने अवैध
गौणखनिज वाहतुकीची शक्यता लक्षात घेता त्याला प्रतिबंध घालण्यासाठी तालुका प्रशासन
सज्ज झाले असून अवैध गौणखनिज वाहतुक करणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे
प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी कळविले आहे.
तालुक्यातील गिरणा नदी पात्रातुन
वाळुची अवैध वाहतूक होण्याची दाट शक्यता लक्षात घेता अवैध गौणखनिज वाहतुक रोखणे
कामी आठ गस्ती पथकांची नेमुणूक प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केली असून
जामदा, उपखेड, वाघळी, वाकडी, वरखेडे बु. येथील नदी पात्रातून वाळू तसेच माती,
मुरूम, दगड इ.गौण खनिजाची अवैध वाहतुक होत असल्यास सदर वाहनांवर दंडात्मक व
आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना आठही पथक प्रमुखांना देण्यात
आल्या आहेत.
प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील व
तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी वाळू लिलावाबाबत ग्रामसभांचे आयोजन करुन अवैध वाळू
वाहतुकीबाबतच्या तक्रारी जाणून घेतल्या व स्वत:चा मोबाईल क्रमांक देऊन या बाबतच्या
तक्रारी थेट मोबाईल वरुन कळविण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने दिनांक 17
नोव्हेंबर 2014 रोजी वाघळी येथील ग्रामसभेनंतर आलेल्या दुरध्वनी तक्रारीच्या
अनुषंगाने वाघळी येथील पाच ट्रॅक्टर अवैध वाळु वाहतुक करतांना आढळून आले व
त्यांच्यावर स्वत: प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे
व गस्तीवर असलेल्या पथकांनी फौजदारी
कारवाई करुन पाचही ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहेत.
महसूल प्रशासनातील महिला तलाठयांनीही केली कारवाई
तालुक्यातील मेहुणबारे व खडकी शिवारात
अवैध गौण खनिज वाहतुक करणा-या दोन ट्रॅक्टर वर कारवाई केली. महिला तलाठी
पि.डी.चौधरी, व्ही.एस.सोनवणे, ए.बी.सुतार, आर.एन.हटकर, आशा साब्बनवार, एन.कोळेकर
यांनी ही कारवाई केल्यामुळे अवैध गौण खनिज
वाहतुक प्रतिबंध घालण्यासाठी महिला
कर्मचारी मागे नसल्याचे त्यांच्या कारवाईवरुन दिसून येते.
अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा
घालण्यासाठी तालुका प्रशासनाने मोठया प्रमाणात कारवाई सत्र सुरु केले असून अशा
प्रकारची अवैध वाहतुकीसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन प्रांताधिकारी मनोज घोडे
पाटील यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment