Wednesday, 19 November 2014

वडगांव-आंबे येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत विविध दाखले वाटप

वडगांव-आंबे येथे सुवर्ण जयंती राजस्व
अभियानातंर्गत विविध दाखले वाटप
                                     
चाळीसगांव,दिनांक 19:- पाचोरा तालुक्यातील वडगांव-आंबे येथे महसूल प्रशासनाच्या वतीने  भिवसिंग फत्तु पवार माध्यमिक विद्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारचे ११४ दाखल्यांचे प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र नजन, मुख्याध्यापक किशोर धना मराठे, वसंत पवार, अरुण पवार, तलाठी एम.एल.साळुंखे यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
दाखले वाटप कार्यक्रमात प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना स्पंर्धा परिक्षांना सामोरे जातांना करावयाची तयारी व दैनंदिन आभ्यासाचे नियोजन या बाबत सखोल मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक किशोर धना मराठे यांनी दाखले वाटपाच्या अभियानामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व होणारा मनस्ताप कमी होणार असल्याने महसूल प्रशासनाचे आभार मानले.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment