Wednesday, 1 October 2014

मास्टर ट्रेनर व सेक्टर ऑफीसरांना दिले मतदान यंत्राचे प्रशिक्षण निवडणूक कामाची जबाबदारी यशस्वीपणे पुर्ण करा ! सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांचे आवाहन !


मास्टर ट्रेनर व सेक्टर ऑफीसरांना दिले मतदान यंत्राचे प्रशिक्षण
निवडणूक कामाची जबाबदारी यशस्वीपणे पुर्ण करा !
 सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांचे आवाहन !

            चाळीसगांव,दिनांक 01:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने 017-चाळीसगांव विधानसभा मतदार संघासाठी नेमण्यात आलेल्या 21 मास्टर ट्रेनर, 24 सेक्टर ऑफीसर व 21 सहाय्यक यांना आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात मतदान यंत्राचे प्रशिक्षण (EVM Training) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी दिले. यावेळी गट विकास अधिकारी मालती जाधव, नायब तहसिलदार निवडणूक विजय सुर्यवंशी, प्रा.डि.एल.वसईकर आदि उपस्थित होते.
            यावेळी  प्रशिक्षण देतांना बाबासाहेब गाढवे यांनी मतदान यंत्र हाताळतांना घ्यावयाची काळजी, सेटींग सिलींग करणे, मॉकपॉल घेणे यासारख्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. तर प्रा.डि.एल.वसईकर यांनी प्रत्यक्ष मतदान यंत्राचे प्रात्याक्षिक दाखविले.
            या प्रशिक्षणावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक कामकाजाची जबाबदारी यशस्वीपणे पुर्ण करा असे आवाहन करुन मतदान यंत्राचे प्रात्यक्षीके आपणास नेमुण दिलेल्या मतदान केंद्रावरील मतदारांना दाखवावे व मतदारांमध्ये जनजागृती करुन  अधिकाधिक मतदान कसे होईल यावर आपल्या स्तरावरुन आपआपल्या मतदान केंद्रावर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना यावेळी  दिल्या. निवडणूकी संदर्भातील पहिले प्रशिक्षण हे दिनांक 02.10.2014 रोजी व दुसरे प्रशिक्षण हे दिनांक 11.10.2014 रोजी वैभव मंगल कार्यालय, भडगांव रोड, चाळीसगांव येथे आयोजित करण्यात आले असून सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सुचना केल्या तसेच सदर प्रशिक्षण वर्गास अनुपस्थित राहणा-या अधिकारी कर्मचा-यांवर लोकप्रतिनीधीत्व ‍कायदा अधिनियम 1951 च्या कलम 134 अन्वये  कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.


                                                      * * * * * * * *

No comments:

Post a Comment