महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून
वाचविण्याचे मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे
पंढरपूर, दि.9: महाराष्ट्राला
दुष्काळाच्या संकटातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, हे वर्ष राज्याला सुख-समृध्दी,
भरभराटीचे आणि शांततेचे जावो असे साकडे
विठ्ठल चरणी घातले असल्याचे मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आषाढी
एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते झाली.महापूजेनंतर
आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दिलीप
सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, उल्हासदादा पवार,
माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते,आ.भाऊसाहेब खाडे, मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब
डांगे, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी
बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे ही
महापुजा करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले, राज्यात कालपासून सर्वत्र
चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. हे वर्षे जनतेला सुख-समृध्दीचे जावो अशा
शुभेच्छा दिल्या.
मानाचे वारकरी
मुख्यमंत्री
चव्हाण यांच्या समवेत शासकीय महापूजेचा मान यावर्षी राम निवृत्तीनाथ शेळके, वय-48
वर्षे, सौ.प्रमिला राम शेळके वय-45वर्षे, या दांपत्यास त्यांचा मुलगा चिंरजीव
संगमेश्वरसह मिळाला. श्री शेळके मु/पो- नंदीबिजलगांव, तालुका-औराद, जिल्हा-बिदर
यांना मिळाला. श्री. शेळके यांचा व्यवसाय शेती असून, गेल्या 22 वर्षापासून
पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंडपणे सुरु असून, त्यांच्या तिस-या पिढी सह सर्व
कुटुंब वारकरी सांप्रदायातील आहे.
प्रारंभी
मंदीर समितीच्यावतीने मुख्यमंत्र्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते. मानाच्या वारकरी दापंत्याचा सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा मोफत सवलत पास देण्यात आला.
याप्रसंगी
नगराध्यक्षा उज्जलाताई भालेराव, जि.प.अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी
संजय तेली, तहसिलदार गजानन गुरव, मंदीर
समितीचे व्यवस्थापक एस.एस. विभूते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व
छायाचित्र हे खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment